रिसोड(Risod) :- हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने रिसोड तालुक्यातील बिबखेडा येथील बस स्टॉप वर फिरणाऱ्या एका युवकावर रिसोड पोलिसांनी कारवाई (action) करत तलवार जप्त केल्याची केल्याची कार्रवाई दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता दरम्यान केली असून सचिन किसन नरवाडे वय 24 वर्षे राहणार बीबखेडा असे तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाचे नाव असून त्यावर रिसोड पोलिसांनी कलम 4, 25 शस्त्र अधिनियम 1959 नुसार कारवाई करत त्यावर आगामी निवडणुका संदर्भात प्रतिबंधक कारवाई केली आहे.
तलवार जप्त, रिसोड पोलीसांची कारवाई
याबाबत पोलीस (Police)सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सचिन किसन नरवाडे हा युवक बिबखेडा येथील बस स्टॉपवर हातात खुली तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने फिरत होता. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तरे, पोलीस उपविभागीय अधिकारी अग्रवाल यांचे मार्गदर्शनात ठाणेदार भूषण गावंडे, सहाय्यक पो.उपनिरीक्षक वसंत तहकीक, पो.उ.निरिक्षक सैय्यद हारुण, रतन बावस्कर, निलेश तायडे, सुनील इंगळे, चालक इंगोले, यांनी घटनास्थळ गाठून सदर युवका कडुन तलवार (sword) जप्त करून त्याच्यावर कारवाई केली पुढील तपास सहायक पोलीस उप निरिक्षक वसंत तहकीक करत आहे.