रिसोड(Risod) :- अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दूचाकी स्वार युवकाचा मृत्यू (Death)झाल्याची घटना दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान महागाव जवळ घडली..
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
याबाबत रिसोड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामेश्वर बबन सोळंके रा. मसलापेन ता रिसोड जि वाशिम यांनी रिसोड पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा लहान भाउ नामे राजु बबन सोळंके वय 22 वर्ष दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी 3 वा चे दरम्यान मांगुळ झनक येथे जाऊन मजुरीच्या कामा करीता मजुर पाहुन येतो असे सांगुन त्याचे मालक यांची मोटर सायकल हिरो एचएफ डिलक्स क्रमांक एम एच 28 ए ई 8880 घेउन एकटाच मसलापेन येथुन मांगुळ झनक येथे आला.
उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू
त्यानंतर रात्री 10 वाजताच्या दरम्यान मुरली चव्हाण रा. चांडस यांनी सांगीतले की, तुझा लहान भाउ राजु बबन सोळंके हा रात्री 7 ते 7: 30 वा चे दरम्यान त्याचे मोटर सायकल ने महागाव येथुन मसाला पेन येथे येत असतांना महागाव जवळील शंकर हुंबाड यांचे शेताजवळील रोडवर त्याचे मोटर सायकल अज्ञात वाहन चालकाने धडक मारली त्यामुळे तुझा भाउ राजु सोळंके हा गंभीर जखमी झाला आहे व त्याला उपचारा करीता सरकारी दवाखाना (Govt. hospital) रिसोड येथे नेले आहे. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी कलम 281 106 (1)नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंतराव तहकीक, पो का सुनील तिवाले करीत आहेत