उमेदवारांच्या सभा, काॅर्नर सभांच्या खर्चाचा ताळमेळ नाही
रिसोड (Risod Assembly Election) : रिसोड-मालेगांव विधासभा मतदारसंघ 33 च्या प्रचार सभांचे नारळ फुटले आणि बहुतांश उमेदवरांनी सभा, काॅर्नर सभा, डोअर टु डोअर भेटींना प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे उमेदवरांच्या कुटुंबातील उमेदवारांच्या कुटुंबातील अनेक सदस्य वेगवेळ्या सभा,काॅर्नर सभा घेत आसुन यावर निरीक्षणासाठी तीन पथकांची नेमणुक केलेली आहे. विना परवाना झालेल्या प्रचार बैठकावर काय कारवाई केली तसेच प्रचाराच्या पहील्या तीन दिवसातील उमेदवरांच्या खर्चाचा हिशोब खुद निवडणुक विभागाकडे उपलब्ध नसल्याने सदर निवडणुक यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत यावर निवडणुक प्रक्रियेतील एकही अधिकारी, कर्मचारी बोलण्यास तयार नाही, हे विशेष…
रिसोड-मालेगाव (Risod Assembly Election) विधानसभा मतदारसंघामध्ये 13 उमेदवार आसुन या पैकी काही उमेदवरां मध्ये कमालीची चुरस दिसुन येते. प्रचारासाठी उणेपुरे दिवस बाकी आसल्याने उमेदवरांच्या कुटुंबातील पत्नी, मुले, नातेवाईक सभा, काॅर्नर सभा एकाच दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेत आसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत असून आता पर्यंत ज्या प्रचार सभांचे नारळ फोडले गेले,त्या सभासाठी निवडणुक निर्णय अधिकारी यांची रितसर परवानगी घेतलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. उमेदवरांच्या प्रचारासाठी कुटुंबातील अनेक व्यक्ती विविध गावातील सभा,काॅर्नर सभा घेत आसतांनी त्यावर होणा-या खर्चाची गोळा बेरीज कोण करनार ?, हा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे.
निवडणुक प्रचारादरम्यान (Risod Assembly Election) वेगवेगळ्या पथकांची नेमणुक केली आसुन एकुण 43 वाहणांचा ताफा आसुन प्रती दिवस वाहणांच्या इंधनाचा खर्च हजारो रूपया पर्यंत होत आहे. या खर्चाचे कुठलेच ऑडीट सुध्दा होत नाही. मग लाखोंचा खर्च होत आसतांनी भरारी पथकांचे कचखाऊ धोरण कशासाठी विशेष म्हणजे मागील तीन दिवसातील प्रचार सभावरील खर्चाचा ताळा साहाय्यक निवडणुक अधिकारी यांच्या कडे तयार नव्हता. मग दररोज होणा-या सभावर वरील झालेला खर्च उमेदवरांना सादर करणे आवश्यक आहे का ? नाही का प्रश्न निर्माण झालेला आसुन अद्याप आचारसंहितेचा भंग केल्याचा एकही गुन्हा निवडणुक प्रचारा दरम्यान दाखल झालेला नाही.या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील का ? आशा प्रकारची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
वैशाली देवकर (साहाय्यक निवडणुक अधिकारी रिसोड) प्रचाराला प्रारंभ होऊन तीन दिवस झालेले आहे. याकडे आमच्या पथकाचे लक्ष आहे. परंतु अद्याप मागील तीन दिवसातील प्रचारातील उमेदवरांच्या सभा, काॅर्नर सभाच्या खर्चाचे विवरण उपलब्ध होत आहे, खर्चाची विवरण करणे सुरू आहे.