शिवाजीनगर येथील घटना
रिसोड (Risod Crime) : रिसोड शहरातील वाशिम मार्गावरील शिवाजीनगर भागातील तीन दुकाने फोडून आज्ञात चोरट्यानी (Risod Crime) यांनी 3 लाख 52 हजार 430 रुपयाचा एवज लंपास केल्याची घटना दिनांक 29 जानेवारीच्या मध्यरात्री दरम्यान घडली. याबाबत अक्षय भागवत मोरे राहणार शिवाजीनगर रिसोड यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे रिसोड वाशीम मार्गावर कृषी सेवा केंद्राचे दुकान असून दैनंदिन प्रमाणे त्यांनी 29 जानेवारी रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान आपले दुकान बंद करून आपल्या घरी निघून गेले.
सकाळी जेव्हा ते आपले दुकान उघडण्याकरिता आले असतात त्यांना दुकानाचे शटर चे पट्ट्या तुटलेल्या अवस्थेत आढळले आत जाऊन बघितले असता त्यांना त्यांच्या दुकानातील कॅमेरा डिव्हायडर, औषधी, कीटकनाशक व अन्य वस्तू असा 3 लाख 29 हजार 930 रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे निदर्शनात आले. त्यांच्या दुकानाच्या लगतच असलेल्या नागेश जाधव यांचे हार्डवेअर मधील गल्ल्यातील 7500 व शिवराय फार्मा च्या गल्ल्यातील 22 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरून नेला.
तीनही दुकानातुन अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 52 हजार 430 रुपयाचा ऐवज चोरून नेला असून रिसोड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात कलम 334 (1) 305 (अ)अनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच (Risod Crime) रिसोड पोलिसांनी घटनास्थळी ठिकाणी चोरट्यांचा सुगावा लागावा यासाठी वाशीम इथून श्वानपथक व फिंगर एक्सपर्ट बोलण्यात आले होते