रिसोड (Risod distribution) : रिसोड येथिल आझाद नगरातील (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदर बांधकामाच्या बाहेरील भागाने लिफ्टचे काम सुरू असतांना एका कारागीराला विजेच्या उच्चदाबाच्या वाहीणीचा शाॅक लागुन मृत्यु झाल्या नंतर महावितरण कंपनी खडबडुन जागे होते. संबंधित बांधकाम मालकाला तात्काळ बंद करून (Electricity Distribution) विजवाहिनी जवळील केलेले काम तात्काळ काढुन घेण्याची नोटीस बजावली आहे.
रिसोड शहरातील ता. 6 मे रोजी आझाद नगरातील (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदर काॅम्पलेक्सच्या बांधकामाला नगरपरिषदेने काही अटी व शर्तीच्या आधारावर परवानगी दिल्याची माहीती आहे. परंतु सदर बांधकाम (municipal council) नगरपरिषदने दिलेल्या परवानगी नुसार होत आहे का ? याकडे कधी नगरपरिषदेने लक्ष दिले का ? येथील बालाजी काॅम्पलेक्स चे काम सुरू आहे. या काॅम्पलेक्स मधील गाळ्यानुसार खाली पार्किंग ची जागा संबंधित काॅम्पलेक्स धारकाने ठेवलेली आहे का?
विशेष म्हणजे, (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सच्या इमारती जवळ (Electricity Distribution) महावितरणची 11 केव्ही चे पोल आहेत. इमारतीपासुन (Central Electricity Authority) केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा व विद्यु पुरवठा संबंधिचेए उपाय ) विनीमय 2010 नुसार बबेकायदेशीर आहे. विनीमय क्रमांक 61(1)चे उलंघन करणारे आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरण ,सुरक्षा व विद्युत पुरवठा संबंधीचे नियमानुसार इमारतीचे उच्चदाब विजवाहिनीपासुन उभे व आडवे अंतर अनुक्रमे 3.7 मीटर व 1.2 मिटर आसणे आवश्यक आहे.
सदर नोटीस प्राप्त होताच, नियमबाह्य होत आसलेले बांधकाम तात्काळ थांबवावे अन्यथा काही विपरीत घटना घडल्यास संपुर्ण जबाबदारी संबंधित काॅम्पलेक्स मालकावर राहणार आहे. याच्याशी (Electricity Distribution) विजवितरण कंपनीचा कुठलाही संबंध राहणार नाही. आशा प्रकारची नोटीस काॅम्पलेक्स मालक अजय नंदकिशोर बगडिया यांना दिली आहे. परंतु सदर घटनेआधी विजवितरण कंपनीला जाग आली असती. (Balaji Complex) काॅम्पलेक्स धारकाने बेकायदेशिर बांधकाम केलेच नसते तर एका निष्पाप मजुराचा बळी गेला नसता. अशा प्रकारची चर्चा नागरिका मध्ये रंगत आहे.