रिसोड (Washim):- 6 जानेवारी 1832 या दिवशी ‘दर्पण’च्या रूपाने पहिले मराठी वृत्तपत्र (Marathi newspaper) सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर यांनी हे पत्र सुरू केले म्हणून जांभेकरांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हटले जाते.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन साजरा
महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन (Journalist’s Day) हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला असून ते मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. इंग्रज सत्ताधाऱ्यांच्या भावना जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले तर स्थानिकांच्या अडचणी इंग्रज सत्ताधाऱ्यांना कळाव्या, यासाठी ‘दर्पण’ मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सोमवारी रिसोड तालुका पत्रकार संघातर्फे स्वामी विवेकानंद वाचनालय येथे साजरी करण्यात आली.
जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रिसोड तहसील च्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष कमलाकर टेमधरे सर, जेष्ठ पत्रकार शंकरराव हजारे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन व हारार्पण करण्यात आले. यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने रिसोड पत्रकार संघांचे सदस्य जयंत वसमतकर यांनी भाषण दिले तसेच आपल्या भाषांनातून त्यांनी आचार्य यांच्या कार्याची माहिती देऊन त्यानी केलेल्या कार्याला अभिवादन केले. यानंतर प्रमुख पाहुणे कमलाकर टेमधरे यांनी सुद्धा आचार्य यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे कार्य सांगितले यानंतर अध्यक्षीय भाषांनातून तहसीलदार तेजनकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या वृत्तपत्राचा इतिहास सांगून समाजात लेखणीला तसेच पत्रकारितेला किती महत्व आहे हे स्पष्ट केले.
या वेळी रिसोड तालुका पत्रकार संघातून सतिष मांदळे, मोहनराव देशमूख, गजानन बानोरे, जयंत वसमतकर, काशिनाथ कोकाटे, विजयराव देशमूख, विनोद बोडखे, गजानन खंडारे,प्रशांत सरनाईक, दत्ता इंगळे,संतोष वाघमारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार संघांचे सदस्य अभयकुमार औंढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन काशिनाथ कोकाटे यांनी केले.