रिसोड (Risod Panchayat Samiti) : रिसोड पंचायत समिती मध्ये मा.आ. भावनाताई गवळी (MLA Bhavnatai Gawli) यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवार दि .28 जानेवारी 2025 रोजी 11 वा.आढावा सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी रिसोड तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य व लाभार्थ्यांनी आपापल्या समस्या घेऊन पंचायत समितीमध्ये प्रशासणाच्या वतीने उपस्थित राहाण्याचे आवाहण करण्यात आले आहे.
जिल्हा परीषद,पंचायत समित्याचा (Risod Panchayat Samiti) कार्यकाळ नुकताच संपला त्यामुळे विकासात्मक कामा संदर्भात लोकप्रतिनींची वानवा दिसत आसल्याची तालुक्यातील अनेक गावा मध्ये चर्चा सुरू होती. कारण शासण दफ्तरी विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनीधींची भुमिका महत्त्वाची आसते.परंतु नुकताच जिल्हा परीषद, पंचायत समिती लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपल्याने अनेक विकासात्मक कामांची गती संथ झालायाचे बोलल्या जात होते.
परंतु विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी (MLA Bhavnatai Gawli) यांच्या माध्यमातून आणि गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ता.28 जानेवारीला सकाळी 11 वाजता.आढावा सभेचे आयोजन पंचायत समिती सभागृहा मध्ये आयोजन केल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत विकासात्मक कामांना चालणा मिळण्याची शक्यता बळावली आहे. या सभेला (Risod Panchayat Samiti) रिसोड तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या समस्या घेऊन उपस्थित रहावे असे आव्हान महादेवराव ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख,युवा सेना जिल्हाप्रमुख संजय भुतेकर, अनिल गरकळ, शिवसेना तालुका प्रमुख, शिवाजीराव खानझोडे, शहर प्रमुख अरुण मगर, युवा सेना तालुकाप्रमुख एड,गजाननराव अवताडे, युवा सेना शहर प्रमुख कपिल कदम यांनी केले आहे.