दरोड्याची योजना करून मालकाची फसवणूक
रिसोड (Risod Police) : दरोड्याची योजना आखून मालकाची फसवणूक करणाऱ्या नौकराला (Risod Police) रिसोड डीबी पथकाने मालासह अटक केली.ही घटना 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता घडली. रिसोड शहरातील बालाजी ज्वेलर्सचे मालक गणेश बगाडिया, वय 49 वर्षे, सराफ लाईन रिसोड यांनी (Risod Police) रिसोड पोलीस ठाण्यात 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता तक्रार दाखल केली कि गोविंद उत्तम मिटकरी वय 32 वर्षे, रहिवासी, निजामपूर ता. रिसोड यांच्याकडे 500 रुपयांच्या 1000 च्या नोटा बँकेत जमा करण्याकरता दिल्या होत्या ज्याचा अनुक्रमांक 6HP 087001 ते 6HP 088000 असा होता आणि एकूण 5 लाख रुपये रिसोदच्या बी वाशिम अर्बन बँक खात्यात जमा करायचे होते.
बँकेत जाण्यासाठी मोपेड कंपनीची चार्जिंगची दुचाकी दिली होती, मात्र बँकेत पैसे न भरता त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी माझी आर्थिक फसवणूक झाल्याची लक्षात आल्याने दुकानाचे मालक गणेश बगाडिया यांनी नौकर गोविंद मिटकरी यांच्या मोबाईलवर फोन केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दुकान मालकाला नोकराचा संशय आल्याने त्यांनी रिसोड पोलीस ठाण्यात येऊन नौकरानी आर्थिक फसवणूक केल्याचे बालाजी ज्वेलर्सचे मालक गणेश बगाडिया यांच्या फिर्यादीवरून कलम ३१६(४), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला.
रिसोड पोलीस स्टेशनचे (Risod Police) ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले यांनी दरोड्याची योजना आखणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता गोपनीय माहितीच्या आधारे, फरार नोकर गोविंद मिटकरी हा परिसरात फिरत असल्याचे समजतात 23 सप्टेंबर 2024 रोजी रात्री आरोपी गोविंद मिटकरी याच्याकडून रिसोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आरोपी गोविंद मिटकरी याच्याकडून मोपेड चार्जिंगची दुचाकी अंदाजे किंमत 25 हजार रुपये व रोख 5 लाख रुपये असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई रिसोड पोलीस (Risod Police) ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे, डी बी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन गोखले, कॉन्स्टेबल श्रीकृष्ण नागरे, अमलदार रवी अडागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोने, वैभव गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन गोखले व पोलीस करीत आहेत.