रिसोड (Risod Police) : लिफ्टचे काम करत असताना शॉक लागून वीस फूट उंच अंतरावरून पडून मजुराचा मृत्यूप्रकरणी रिसोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केला जात आहे. सदर प्रकरण पाहता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र एका (Risod Police) पोलिस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सदरचा आकस्मिक मृत्यूची नोंद करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा रिसोड शहरात वर्तवीली जात आहे.
बांधकाम मालकाला तात्काळ काम बंदची नोटीस
रिसोड येथील लोणी मार्गावरील आझाद नगरातील (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदर बांधकामाच्या बाहेरील भागाने लिफ्टचे काम सुरू असतांना एका कारागीराला विजेच्या उच्चदाबाच्या वाहिनीचा शाॅक लागुन मृत्यु झाल्यानंतर, महावितरण कंपनी कडून सदर कॉम्प्लेक्स धारकाला नोटीस बजावण्यात आली होती. संबंधित बांधकाम मालकाला तात्काळ बंद करून विजवाहिनी जवळील केलेले काम तात्काळ काढुन घेण्याची नोटीस बजावली आहे.रिसोड शहरातील 6 मे रोजी आझाद नगरातील (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.
नगरपरिषदेने याकडे कधी लक्ष दिले का ?
सदर (Balaji Complex) काॅम्पलेक्सच्या बांधकामाला नगरपरिषदेने काही अटी व शर्तीच्या आधारावर परवानगी दिल्याची माहीती आहे. परंतु सदर बांधकाम (municipal council) नगरपरिषदने दिलेल्या परवानगी नुसार होत आहे का ? याकडे कधी नगरपरिषदेने लक्ष दिले का ? येथील बालाजी काॅम्पलेक्स चे काम सुरू आहे. या काॅम्पलेक्स मधील गाळ्यानुसार खाली पार्किंग ची जागा संबंधित काॅम्पलेक्स धारकाने ठेवलेली आहे का?विशेष म्हणजे बालाजी काॅम्पलेक्सच्या इमारती जवळ महावितरणची 11 केव्ही चे पोल आहेत.
तक्रार आलेली नसल्याने विविध चर्चेला उधाण
सदर धोकादायक ठिकाणी मजुरांकडून काम करून घेणे हे अत्यंत कठोर निर्णया असल्याचेही बोलले जात आहे. यामध्ये (municipal council) नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. सदर मजूर मृत्यूप्रकरणी त्याच्या परिवारातील कोणत्याही सदस्यांनी तक्रार दाखल केलेली नाही. अद्यापपर्यंत तक्रार आलेली नसल्याने विविध चर्चेला उधाण आलेले आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, या संदर्भात काहींची बयान घेण्यात आली. तपासांअती पुढील कारवाई केल्या जाईल, असे तपास (Risod Police) अधिकारी यांनी सांगितले