आयशियर,स्काॅर्पिओ, दुचाकी,तांदुळ जप्तीसह सुमारे विसलक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त
रिसोड () : तालुक्यातील लोणी येथुन रेशनचा तांदुळ घेऊन जाणाऱ्या आयशियर वाहनावर (Risod Police) रिसोड पोलिसांच्या डिबी पथकाने धडक कारवाई करीत,याच दरम्यान एक स्काॅर्पिओ, आणि एक मोटार सायकल वरून अविधरित्या देशी-विदेशी दारू वाहतुक करतांनाच्या कारवाई मध्ये सुमारे विस लक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली (Risod Police) रिसोड पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी संत सखाराम महाराज लोणी येथिल गांधारी रस्त्या जवळ ज्ञानेश्वर माऊली मंदिरा जवळील घटनास्थळी जाऊन चारचाकी आयशर वाहनाची (एमएच 37 टी 1560) झडती घेतली असता त्या वाहनात दहा टन शासकीय रेषणचा तांदुळ असुन तो काळ्या बाजारात विकण्यासाठी जात असल्याची आढळुन आले. सदर वाहनाची अंदाजे किंमत 7 लाख रुपये एवढी आहे. सदर रेशनचा एकुण नऊ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
हा रेशनचा तांदूळ पुढील कारवाईसाठी (Risod Police) रिसोड पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे एका संशयीत स्काॅर्पिओ क्रमांक एम.एमच.28 सि.बी.5557 गाडीची तपासणी केली आसता. 4 हजार 360 रूपयांची विदेशी दारूसह 12 लक्ष रूपयांची स्काॅर्पिओ गाडी ताब्यात घेतलीषाहे. तर याच दरम्यान निजापुर येथिल एक इसम मोटारसायकल क्रमांक एम.एच.37 ए.एस.3230 गाडीची तपासणी केली आसता. 8 हजार 460 रूपयांची देशी दारू जप्त केली आहे. शासकीय रेशनच्या तांदळाबाबत रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व अन्न पुरवठा विभागाला अहवाल सादर करण्यात आला असुन, अन्न पुरवठा विभागा कडुन अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, आशा प्रकारची माहीती (Risod Police) पोलीस प्रशासनाने दिली आहे.
लोणी ठरत आहे,रेषणच्या अवैध अन्नधान्याचे हाॅटस्पाॅट
तालुक्यातील लोणी हे शासकीय रेषणच्या अन्नधान्याचे हाॅटस्पांट आसल्याचे पुर्वी पासुन अधोरेखीत झालेले आहे.कारण मागील काही वर्षां मध्ये लोणी येथिल व्यापा-यांवर अनेकदा अवैध रेषण चा तांदुळ,गहु काळ्या बाजारात विक्रीला जातांना संबंधित विभागाने कारवाई केलेली आहे. तरी सुध्दा गरीबांच्या ताटाले अन्नाचे घास लोणी येथिल व्यापारी ओरबडत आसल्याचे विदारक चित्र परव्याच्या कारवाईने दिसुन येते. (Risod Police) लोणी येथिल रेषणच्या अन्नधान्याचा काळा बाजार चालविण्याला नेमके कोणाचे पाठबळ मिळत आहे. याच्या खोलात जाणे आवश्यक आसुन येथिल रेषणच्या अन्नधान्याच्या काळा बाजार करणा-यांवर कठोरात कठोर कारवाई ची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.