रिसोड तालुक्यातील बारावी परीक्षेत अनेक परीक्षा केंद्रात काॅपीमुक्तीचा फज्जा
रिसोड (12th Exam Copy Exemption) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून वर्ग बारावी परीक्षेला 10 फेब्रुवारी पासुन प्रारंभ झाला,शिक्षण विभागाने यंदाची परीक्षा काॅपीमुक्त घेण्याचा चंग बांधल्या नंतरही अनेक कचखाऊ परीक्षा केंद्रा मध्ये मासकाॅपीचा भंडाफीड हा शिक्षणाधिकारी ससाने यांनी करताच अनेक संस्थेतील कर्मचा-यांचे पित्त खवळले आणि थेट बातमीदारांच्या विरोधात अनेक गृपवर अक्षेपार्ह संदेश व्हायलर करीत आपले अकलेचेच तारे तोड्याचा प्रकार रिसोड तालुक्यात घडला.
रिसोड तालुक्यातील बारावी परीक्षेच्या (12th Exam Copy Exemption) काही केंद्रावर शिक्षणाधिकारी ससाणे यांच्या फरारी पथकाने भेट दिली,या भेटी दरम्याने रिसोड तालुक्यातील एक ग्रामीण व शहरी भागातील परीक्षा केंद्रातील मास काॅपीवर ससाने यांनी धडक कारवाई केली.सदर घटनेचे वृत्त काही वृत्तपत्रा मध्ये प्रकाशित झाल्याने एका संस्थेतील एका (विद्यालयावर कधीच उपस्थित राहात नसलेल्या परंतु सूस्था चालकाच्या कुटुंबातील) कर्मचा-याचे ता.16 फेब्रुवारी च्या रात्री तारतम्य बिघडलेल्या आवस्थे काही व्हाॅट्अॅप गृपवर बातमीदारांच्या विरोधात काही अक्षेपार्ह मचकुर प्रकाशित झाला.हा अक्षेपार्ह मचकुरा मागे दडली होती.ती शिक्षणाधिकारी ससाणे यांच्या भरारी पथकाने केलेली धडक कारवाई आणि कारवाई नंतरचे वृत्त याची दुस-या दिवशी वा-याच्या वेगाने चर्चा होताच.
विद्यालयाने काही आपल्याच संस्थेतील जाणव्यातील शिक्षक (पत्रकार) ना त्या अक्षेपार्ह मचकुरा संदर्भात स्पष्टीकरण देण्यास प्रावृत्त केले.परंतु घटने नंतर प्रकाशित झालेल्या वृत्ताने त्या संस्थेच्या कर्मचा-यांच्या बुडात लागलेली आग हीच काॅपी मुक्त अभियानाच्या विरोधात आसल्याचे स्पष्ट दिसुन आले.विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अनेक परीक्षा केंद्रावर शहरातील वर्ग बारावी विद्यार्थांचा भरणा कशासाठी हा यक्ष प्रश्न सुध्दा सोडविणे शिक्षणविभागातील भरारी पथकापुढे उभा ठाकलेला आहे.




