शेतकरी आत्मबळ प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी करणार मार्गदर्शन
रिसोड (Farmer Suicide) : जिल्ह्यातील शेतकरी नानाविध (Farmer Campaign) आडचणीचा सामना करतांनी अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्त्या सारखा मणाला वेदना देणारा मार्ग अवलंबीला यामध्ये अनेक शेतकरी कुटुंबाची वाताहत झालेली आहे. आशा बिकट परिस्थितीतुन धेर्याच्या मार्गाचा सामना करणा-या (Farmer Campaign) शेतकरी कुटुंबांना आत्मबळ प्रशिक्षणाचे आयोजन (Washim Collector) वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या कल्पनेतुन रिसोड तहसील कार्यालयामध्ये ता. 13 मे रोजी आयोजित केले आहे.
शेतकरी आत्मबळ प्रशिक्षणाचे आयोजन
वाशीम जिल्ह्याची आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन निर्माण झालेली ओळख पुसण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी उदय राठोड यांनी “पथदर्शी” कार्यक्रम राबविला होता. त्यावेळी जिल्ह्यातील आत्महत्या झालेल्या तीन गावामध्ये रिसोड तालुक्यातील मांडवा, लोणी खुर्द या दोन गावांचा समावेश होता. त्याच धर्तीवर नव्याने जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या कल्पनेतुन (Farmer Suicide Free District Campaign) शेतकरी आत्महत्त्या मुक्त वाशीम जिल्हा अभियानाअंतर्गत रिसोड तालुका शेतकरी आत्मबळ प्रशिक्षणाचे आयोजन ता. 13 मे रोज सोमवारला तहसिल कार्यालयामध्ये सकाळी 11 ते 5 या वेळेत आयोजित केला आहे.
पिक कर्ज व्याजमाफी, पुनर्गठण योजना
या आत्मबळ प्रशिक्षणा मध्ये मनोविकारतज्ज्ञ डाॅ. श्वेता मोरवाल ह्या शेतकरी (Farmer Campaign) आणि आत्मबळ उन्नती, शेती उत्पादन खर्च कमी करणे या विषयावर जैविक शेतीचे प्रशिक्षक संजय मांडवगडे मार्ग दर्शन करतील तर पिक पध्दती या विषयावर रिसोड तालुका कृषी अधिकारी मदन तावरे मार्गदर्शन करतील. पिक कर्ज व्याजमाफी, पुनर्गठण योजने संदर्भात शेतक-यांनहना मार्गदर्शन स्टेट बॅंकचे शाखा व्यवस्थापक राहुल बारापात्रे, शेती संबंधित कौशल्य विकास यावर जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सिमा खिरोडकर,बालविवाह प्रतिबंध उपाययोजना या विषयावर कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी मार्गदर्शन करीत तालुक्यातील शेतकरी वर्गाने जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन, तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी केले आहे.