रिसोड (Risod Police) : बसमध्ये प्रवास करत असताना वाहकाने तिकिटाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून (Risod Bus) एका प्रवाशाने वाहकास मारहाण केल्याची घटना आज दिनांक 13 मे रोजी सकाळी 10:15 वाजता रिसोड वाशिम मार्गावर हराळ फाटा येथे घडली. याप्रकरणी (Risod Police) पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसोड आगारातील (Risod Bus) बस वाहक मनोज किसन थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज सकाळी दहा वाजता ते आपले सहकारी चालकला घेऊन रिसोड ते वाशिम बस घेऊन निघाले. तिकिटाचे पैसे घेत असताना विजय रमेश चतरकर वय 34 वर्षे राहणार पेनबोरी याकडे आले. त्यांनी त्यास तिकिटाचे पैसे मागितले व तसेच याच्या सोबत असलेल्या मुलीबद्दल विचारणा केली.
रिसोड-वाशिम मार्गावर हराळ फाट्यावरची घटना
चतरकरने मुलीचे वय सहा वर्षे असे सांगितले, यावर थोरात यांनी मुलीचे अर्धे तिकीट लागत असल्याचे बोलले व त्यांनी तिकिटाचे पैशाची मागणी केली. यावरून विजय चतरकर यांनी पैसे देण्यास नकार दिला व वाहक थोरात सोबत वाद घालून त्यांना डोक्यावर चेहऱ्यावर गालावर चापटाने बुक्क्याने मारहाण केली. तसेच (Risod Bus) बस अडवून ठेवत बस पुढे कशी नेतो मी बघून घेतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी (Risod Police) रिसोड पोलिसांनी कलम 353, 332, 341, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर दानडे करत आहेत.