रिसोड (Worker death) : रिसोड शहरातील आझाद नगर मध्ये बालाजी व्यापारी संकुलाचे (commercial complex) बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदर व्यापारी संकुल बांधकामाला नगरपरिषदेची परवानगी अटी व शर्त नुसार देण्यात आली आहे. परंतु या व्यापारी संकुलाचे बांधकाम नियमानुसार होत नसल्याने, याकडे प्रशासणाचे दुर्लक्ष आसल्याची घटनास्थळी चर्चा होती. या संकुलाच्या लिफ्टचे बांधका सुरू आसतांनी आज दुपारी अजय कुमार साहू वय 18 रा बलरामपूर उत्तरप्रदेश मजुराला विद्युत पोलाच्या जिवंत तारांचा शाॅक लागुन, संकुलाच्या तीस-या मजल्या वरून मजुर खाली कोसळुन मुत्यु पावल्याची घटना घडली आहे.
रिसोड येथिल मुख्यमार्गावर बालाजी व्यापारी संकुलाच्या (commercial complex) लिफ्टसह, इतर कामे सुरू आहेत. लिफ्टचे काम सुरू आसतांनी संबंधित (Worker death) मजुराला विद्युतपोल वरील जिवंत तारांचा जबर शाॅक लागुन सदर मजुर गंभीररीत्या भाजुन तीस-या मजल्या वरून खाली पडला. ही घटना अत्यंत गंभीर होती. कारण तीस-या मजल्या वरून शाॅक लागुन पडलेला मजुर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.घटनेची माहीती. मिळताच अनेकांनी मदती साठी धाव घेत त्या मजुराला उपचारासाठी शासकीय रूग्णालया वाशिम मध्ये दाखल केले. परंतु अवघ्या काही वेळातच सदर मजुराचा मृत्यु झाल्याची माहीती आहे.
घटनेतील व्यापारी संकुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह
रिसोड शहरातील आझाद नगरस्थीत व्यापारी संकुलाचे (commercial complex) अनेक मजली बांधकाम अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदर व्यापारी संकुलाच्या गाळ्यानुसार पार्कींग आहे का ? लिफ्ट बसविण्यासाठी परवानगी घेतली होती का? या व्यापारी संकुलाचे आणि विद्युत पोलचे अंतर किती आसायला पाहीजे ? आशा विविध प्रश्नांचा भडीमार शहारामध्ये होत आहे.आता तरी नगर परीषद आशा गंभीर प्रकाराकडे लक्ष देणार का ? आशा प्रकारची नागरिका कडुन मागणी पुढे येत आहे.
दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होईल का ?
रिसोड येथिल व्यापारी संकुलाचा (commercial complex) मागील अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. सदर कामावर बाहेरील राज्यातील (Worker death) मजुर काम करीत आसुन संबंधित कंत्राटदार मेहकर येथिल आसल्याची माहीती आहे.घटनेतील मजुराच्या मृत्युचे मुल्यमापन पैशाने तोलल्या जाणार का ? संबंधितावर कठोर कारवाई होणार का..?
सतीष शेवदा (मुख्याधिकारी नगरपरिषद रिसोड)
सदर व्यापारी संकुलाच्या बांधकामाला नियम व अटीनुसार बांधकाम परवानगी देण्यात आलेली होती. परंतु या (commercial complex) काॅम्लेक्सचे बांधकाम नियमानुसार सुरू आहे का ? या संदर्भात चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.