घटनास्थळी कामगार अधिकारी राठोड यांची भेट
रिसोड (Worker Death): रिसोड शहरातील आझाद नगरस्थीत (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच काॅम्पलेक्सच्या बाहेरील बाजुने लिफ्टचे बांधकाम करतांनी परराज्यातील अजयकुमार साहु या 18 वर्षीय युवा कामगाराचा मृत्यु झाला. अकोला-बुलढाणा-वाशीमचे सरकारी कामगार अधिकारी आशिष राठोड यांनी घटनास्थळाला भेट देत, पुढील कारवाईला प्रारंभ केल्याची माहीती आहे.
तात्काळ गाळे मालकाला काम बंद
शहरातील आझाद नगरस्थीत (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सच्या बांधकामा वरील परराज्यातील एका युवकाचा गाळ्याच्या बाहेरील बाजुने लिफ्टचे बांधकाम करतांनी विजवितरणच्या 11 केव्ही जिवंत तारांचा जबर धक्का बसुन मृत्यु झाला होता. सदर घटना गांभीर्याने घेत महावितरण ने तात्काळ गाळे मालकाला काम बंद करण्याची नोटीस बजावत सदर बांधकामावर यापुढे काही घटना, आपघात घडल्यास संबंधित गाळेधारक जबाबदार राहातील, अशा आशयाचे नोटीस बजावल्यानंतर (Risod Police) रिसोड पोलिस स्टेशन चे एपीआय. सागर दानडे यांनी घटनास्थळी भेट देत आकस्मीत मृत्युची नोंद केली आहे. ता.10 मे रोजी सरकारी कामगार अधिकारी आशिष राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळला या संदर्भात काही व्यक्तीचे बयाण घेण्याचा प्रयत्न केला. परंतु राठोड यांना सहकार्य मिळु शकले नाही. सदर ईमारतीचे काम करत आसतांनी मृत्यु पावलेल्या कामगाराच्या मृत्युने शहरातील बालाजी काॅम्पलेक्सच्या बांधकामाविषयी अनेक प्रश्न निर्माण होत आहे. एका कामगाराचा मृत्युप्रकरणी थेट कामगार विभागाने लक्ष दिल्याने त्या परराज्यातील कामगाराच्या मृत्युला योग्य न्याय मिळेल का?, या यक्ष प्रश्नाकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
रिसोड नगरपरिषद अद्यापही कुंभकर्ण झोपेत..!
शहरातील (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्स बांधकाम प्रकरणात एका परराज्यातील कामगाराचा मृत्यु होतो. याची दखल (Risod Police) पोलिस स्टेशन, विजवितरण कंपनी घटनास्थळाला भेट देत पंचानामा करीत, पोलिसांनी मर्ग दाखल केला. महावितरणने सदर बांधकाम तात्काळ बंद करण्याचे नोटीस जारी केले. कामगार अधिकारी यांनी सुध्दा घटनास्थळी भेट देत कारवाई प्रारंभ केला आहे. परंतु स्थानिक नगरपरिषदने घटनास्थळी पाहणी करून काहीच कारवाई न केल्याने नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत आसल्याची चर्चा होत आहे.
आशिष राठोड (सरकारी कामगार अधिकारी)
रिसोड शहरातील (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्स च्याघटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या संदर्भात सदर गाळेधारक मालकाला आमच्या कार्यालयात हजर राहण्या संदर्भात सुचना दिली. अशी माहीती सरकारी कामगार अधिकारी राठोड यांनी दिली आहे.