रिसोड (Risod Tehsildar) : शासनाकडुन दिल्या जाणाऱ्या संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेचा (Niradhar Yojana) लाभ आता डिबीटी मार्फत दिल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थांनी १५ जुन पूर्वी आधारकार्ड नंबर व मोबाईल नंबर तहसील कार्यालयात जमा करावेत. असे आवाहन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर (Tehsildar Tejankar) यांनी केले आहे. शासन स्तरावरुन निरांधारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.
तलाठ्यांकडे कागदपत्रांची पूर्तता करा: तहसीलदार तेजनकर
दरम्यान, शासन निर्देशानुसार एप्रिल २०२४ पासून संजय गांधी (Niradhar Yojana) निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ डिबीटी मार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आधारकार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असून ज्या लाभार्थीचे हे दोन्ही नंबर उपलब्ध नसतील त्यांना अनुदान वितरीत केले जाणार नाही. त्यामुळे पात्र लाभार्थीनी त्यांचे आधारकार्ड नंबर व मोबाईल नंबर गावातील संबंधित तलाठ्यांकडे १५ जून पूर्वी जमा करण्याचे आवाहन तहसीलदार रिसोड (Tehsildar Tejankar) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे केले आहे