तहसीलदार यांचे पथक अवैध रेतीच्या मागावर
रिसोड(Risod):- नुकतेच अकोला लोकसभा निवडणुक संपन्न झाली, निवडणुकी दरम्यान महसुल विभागाकडे अनेक जबाबदा-या आसल्याने रेती माफीया याच संधीचा फायदा घेत अवैध रेतीची वाहतुक (Illegal sand transport) करीत होते. याची माहीती माध्यमातुन समोर येताच तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी आपल्या पथकासह एका अवैध रेती वाहतुक टिप्पर वर धडक कारवाई करीत सदर वाहण रिसोड पोलिस स्टेशन च्या स्वाधीन केले आहे.
रेती टिप्पर चा सिने स्टाईल पाठलाग करीत सकाळी 6 दरम्यान बेधडक कारवाई
मागील दोन दिवसांपासुन रिसोड तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर अवैध रेती वाहतुकीचा कर्दनकाळ ठरत आहेत. मध्यरात्री आपल्या महसुल पथकासह रिसोड -वाकद, रिसोड-लोणी मार्गावर एक प्रकारे गस्त घालत अवैध रेती वाहतुकीला आळा घातल्या जात आहे. तर आज ता.4 मे रोज शनिवार ला सकाळी 4 वाजता पासुन तालुक्यातील अवैध रेती वाहतुक मार्गावर पथकाद्वारे तपास यंत्रणा लक्ष ठेवत मेहकर ते रिसोड मार्गावर एक रेती टिप्पर (sand tipper) तहसीलदार तेजणकर यांच्या निदर्शनास येताच सदर टिप्पर ला थांबण्याचे सांगीतले असता पथकाला गुंगारा देण्याच्या हेतुने रेती टिप्पर सुसाट वेगाने आडमार्गाने निघाले परंतु तहसीलदार तेजनकर यांच्यासह मंडळाधिकारी समाधान जावळे, तलाठी जि.जी.गरकळ, पी.पी.बायस्कर, यांनी संयुक्तीक रित्या गाडी क्र.एम.एच.37 टि.3855 क्रमांकाच्या रेती टिप्पर चा सिने स्टाईल पाठलाग करीत सकाळी 6 दरम्यान बेधडक कारवाई केली.
टिप्पर मध्ये सहा ब्रास रेती
सदर टिप्पर ची चौकशी केली आसता. या टिप्पर मध्ये सहा ब्रास रेती (Six Brass Reti) आढळून आली, चालकाला गौणखणीज वाहतुक परवाना विचारला आसता कुठलाच परवाना नसल्याने सदर अवैध रेती वाहतुक टिप्परवर कारवाई करीत पोलीस स्टेशन रिसोड येथे लावण्यात आले. घटनेतील अवैध रेती टिप्परवर झालेल्या बेधडक कारवाईने अवैध रेती माफीयांचे धाबे दणाणले आहेत. महसुल प्रशासनाचा महसुल बुडवित आसलेल्या किंवा अवैध रेतीची वाहतुक करणा-या कुठल्याही वाहणावर धडक कारवाई (Action against the vehicle) केल्या जाणार आहे. त्यामुळे अवैध रेती वाहतुकीचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यास संबंधित महसुल विभागास (Department of Revenue) कळविण्याचे आवाहण करण्यात येत आहे.