रिसोड (Washim) :- परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील चौधरी परिवारातील तिन भाविक भक्त उत्तर प्रदेश येथील प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला कार क्रमांक एम एच 14 जि एस 9200 जात असताना रिसोड सेनगाव मार्गावर शाही धाब्याजवळ कारचा अपघात (Accident) झाला. ही घटना दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता च्या दरम्यान घडली.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला नालीवर जाऊन अडकली
सदर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला नालीवर जाऊन अडकली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. मात्र यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. रिसोड सेनगाव मार्गावर शाही धाब्या जवळ दुर्घटनेची मालिका सुरूच आहे. एकापाठोपाठ एक या ठिकाणी दुर्घटना होतच आहे. रिसोड सेनगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या या रस्त्या कामामुळे दुर्घटना होत आहेत असे नागरिकांचे म्हणणे आहे. काम सुरू असताना सेनगाव कडून रिसोड कडे येणाऱ्या बाजूने रस्ता काम करत असताना वाहतूक सुरू करण्यापूर्वी रस्त्यावरील पडलेली चुरी माती व त्यावर असलेला रिकामा बारदाना हे हटविण्यात आलेला नाही.
वरदळीचा असलेला हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक
मार्गावर टाकलेल्या डिव्हायडर जवळ रस्ता अरुंद झालेला आहे. यामुळे डिव्हायडर व रस्ता हा नवीन वाहन धारकांना दिसत नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सूचनाफलक लावलेला नाही जेणेकरून वाहन चालकांना याचा अंदाज आला पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे. अत्यंत महत्त्वाचा वरदळीचा असलेला हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्या. जेणेकरून पुढच्या दुर्घटना टाळता येईल अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.