रिसोड (Risod) :- तालुक्यातील भर जहागीर नगरीच्या वतीने सेवानिवृत्त न्यायमुर्ती गोविंदराव आनंदराव सानप,सौ.अंजलीताई गोविंदराव सानप, यांचा सपत्नीक नागरी सत्कार माजी सरपंच सुधाकार काळदाते या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आला, यावेळी न्यायमुर्ती सानप यांनी बालपणातील आठवणींना उजाळा दिला, तेव्हा च्या परीस्थितीच्या आठवणींनी उपस्थित भावनीक झाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
न्यायमुर्ती सानप यांनी दिला जुण्या आठवणींना उजाळा
भर जहागीर येथिल प्राचीन भारद्वाज शिव मंदिर परीसरात हा नागरी सत्कार आयोजित केला होता. न्यायमुर्ती गोविंदराव सानप हे सेवानिवृत्त झाल्या नंतर प्रथमच 1996 नंतर गावामध्ये आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पंढरीनाथ चोपडे यांनी करत, न्यायमुर्ती सानप यांच्या संघर्षमय प्रवासाचे विस्तृत वर्णन केले. यावेळी ह.भ.प.दिनकर बाबांनी न्यायमुर्ती सानप यांचा सत्कार केला. या नागरी सत्कार प्रसंगी न्यायमुर्ती सानप यांनी जागतिक महिला दिना निमित्त महिलांना शिक्षणाचे महत्त्व सांगतांनी तुम्ही सरस्वतीची पुजा करा, लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल, त्याच प्रमाणे माझ्या नगरीने केलेला सत्कार हा नक्कीच माझ्या कुटुंबीया साठी ह्रदयस्पर्शी सत्कार (felicitation) आहे. मी 1996 नंतर प्रथमच सेवानिवृत्ती नंतर माझ्या नगरीतील नागरिकांशी एकरूप होत या सत्कारात सहभागी होण्याचे योग आले. मी देश सेवा करतांनी माझ्या मागे सतत या नगरीचे आशीर्वाद होते.
चारीत्र्य पवित्र करायचे आसेल तर चरीत्र पवित्र ठेवा अशा प्रकारचे विचार व्यक्त केले
तेव्हाच मी न्यायपालीकेचा भाग बनु शकलो. हे सानप यांनी आवर्जुन सांगीतले, तर ह.भ.प.दिनकर बाबा हे न्यायमुर्ती गोविंदराव सानप यांचे बालमित्र आसल्याने नक्किच श्रीकृष्ण-सुदामा या मित्रा प्रमाणे आठवणींना उजाळा मिळाला, ह.भ.प.दिनकर बाबा म्हणाले की चारीत्र्य पवित्र करायचे आसेल तर चरीत्र पवित्र ठेवा आशा प्रकारचे विचार व्यक्त केले, मागील सात दिवसापासुन सुरू आसलेला अखंड हरीणाम, भागवत सप्ताहाचा समारोप झाला, यावेळी अॅड. सुखदेव चौधर, माजी सभापती विश्वनाथ सानप, मुंढे काका, बबन सानप, विश्वनाथ पालवे, माजी सैनिक अशोक सोगे, नंदकिशोर महाजन, श्रीराम सोनुने, राजु कांबळे, भानुदास गिते, गजानन कोरकाणे, अनिल नागरे, ब्रम्हदेव नागरे, पंढरी जायभाये, भगवान गरकळ, गजानन सानप, बळीराम चोपडे, प्रा.बालाजी चोपडे, डाॅ.महादेव कोरकाणे यांच्यासह हजारो महिला-पुरूषांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पंढरीनाथ चोपडे यांनी केले, तर आभार दत्ता सानप यांनी मानले.
सेवानिवृत्त न्यायमुर्ती साकारणार अभ्यासिका आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगा मध्ये अभ्यास महत्वाचा आहे.युवकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी गावामध्ये अभ्यासिका उभारणे अत्यंत आवश्यक आसुन यासाठी प्रा.पंढरीनाथ चोपडे यांच्या माध्यमातून सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आसल्याचे सांगीतले.