Risod:- रिसोड मतदार राजा तू जागा हो, लोकशाहीचा धागा हो… अशा विविध घोषणाद्वारे मतदान टक्केवारी वाढवण्याकरिता शासनाच्या स्वीप पथका द्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात आहे.
अंतर्ग गीत, नृत्य आणि अभिनय या माध्यमातून मतदान जनजागृती
रिसोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक डेपो या ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्ग गीत, नृत्य आणि अभिनय या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. यामध्ये बाकलीवाल विद्यालय वाशिम ची एनसीसी(NCC) चमू प्रा.काळे यांचे मार्गदर्शनात अभिनय व नृत्य याद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. जात, धर्म, पंथ यांचा विचार न करता आणि कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदारांनी मतदान करावे असा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा रिसोड तहसील च्या तहसीलदार प्रतीक्षाताई तेजनकर, स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी बी. एल. कोकाटे, सहा. नोडल अधिकारी पट्टेबहादूर, नप्ते, केंद्रप्रमुख राजेंद्र गिरी, स्वीप सदस्य यांची उपस्थिती होती.
सदर मतदार जनजागृती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक स्वीप पथक सदस्य राजू नामदेव मोरे यांनी केले तर आभार दिगंबर खरबळ यांनी मानले.