रिसोड(Risod):- विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आसुन ता. 15 ऑक्टोबर पासुन निवडणुक आयोगाने आचारसंहिता (code of conduct ) घोषीत केली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नगरपरिषद मुख्याधीकारी सतीष शेवदा यांच्या आदेशानुसार नगरपरिषद कर्मचारी अनधिकृत बॅनर काढण्यासाठी ऍक्शनमोडवर काम करीत असल्याचे दिसुन येते.
मुख्याधिकारी यांचे आचारसंहितेच पालन करण्याचे आव्हान
रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघातील(Assembly constituencies) निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, साहाय्यक निवडणुक अधिकारी प्रतिक्षा तेजनकर, दिपक पुंडे, नगरपरिषद मुख्याधिकारी सतीष शेवदा यांच्या नेतृत्वात नुकतीच तहसिल कार्यालयामध्ये सभा पार पडली असुन निवडणुकी दरम्यान कुठेही आचारसंहीतेचा भंग किंवा उल्लंघन होणार नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. रिसोड शहरातील अनेक ठिकाणी राजकिय नेते मंडळीचे अनधिकृत बॅनर (Unauthorized banner) लागलाले होते. सदर बॅनरवर संबंधित पक्षातील नेत्यांची नावे आसल्याने निवडणुकी दरम्यान सदर नावामुळे किंवा बॅनर मुळे आदर्श आचार संहितेत कुठलाही चुकीचा संदेश मतदारा पर्यंत जाणार नाही या संदर्भात नगरपरिषदचे मुख्याधिकारी सतिष शेवदा यांच्या नेतृत्वात शहराच्या हद्दीतील सर्व राजकिय बॅनर, होल्डींग, उद्घाटन,शुभारंभाच्या ठिकाणी कुठल्याही राजकीय नेत्यांची नावे किंवा चिन्ह दिसल्यास तात्काळ हाटविण्याचे काम नगर परिषद कर्मचारी करत आसल्याने नगरपरिषद अनधिकृत बॅनरसंदर्भात ऍक्शनमोडवर असल्याचे बोलल्या जात आहे. रिसोड शहरात कोणतेही आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये याकरिता राजकीय बॅनर, फलक विनापरवाना लावू नये असे आव्हान मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी केले आहे.