विविध मान्यवरांची उपस्थिती!
रिसोड (Risod) : श्री बालाजी मंदिर, रिसोड येथे भगवान परशुराम जयंती (Parshuram Jayanti) मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून माननीय श्री ठाणेदार रामेश्वर चव्हाण साहेब, नगरपरिषद मुख्याधिकारी (Chief Municipal Council), सतिष शेवदा,माजी नगराध्यक्ष तसेच समाजातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या जयंती उत्सवात महिलांनी, युवकांनी आणि नागरिकांनी (Citizens) मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. भगवान परशुराम महिला सखी मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन आले होते. पुजा-अर्चना,महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातुन जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.