लोणी बुद्रुक येथे तीन महिण्यातील दुसरी घटना
रिसोड (Risod) : तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे ता.08 जानेवारीला दुपारी 2 वाजता दरम्यान आपल्या राहताया घरी गणेश निवृत्ती नरवाडे वय 25 या वेडसर मुलाने वडील निवृत्ती नरवाडे वय 65 वर्षे यांच्या डोक्यावर जोराचावार केल्याने वडीलांचा जागेवरच मृत्यु झाल्याची घटना घडली, घटनास्थळी ठाणेदार भुषण गावंडे हे आपल्या ताफ्यासह हजर होत पुढील कारवाई करीत आसल्याची प्राप्त माहीती आहे.
जिल्ह्याच्या सिमेवर बसलेले लोणी बुद्रुक हे गाव मागील काही महिण्यापासुन खुणाच्या घटनांनी हादरलेले आहे.आज.ता.08 जानेवारीला गणेश नरवाडे वय 25 वर्षे या युवकाने आपल्या राहत्या घरी दुपारी वडीलांच्या डोक्यावर प्रहार केल्याने वयोवृध्द वडील निवृत्ती पुंजाजी नरवाडे वय 65 वर्षे हे जागेवरच कोसळले,या घटनेची माहीती परीसरात वाऱ्या सारखी पसरली घटनेची माहीती पोलिस पाटील यांनी रिसोड पोलिस स्टेशनला कळविताच ठाणेदार भुषण गावंडे यांचा ताफा घटनास्थळी हजर होत आरोपीला (Accused) ताब्यात घेतले, गणेश नरवाडे याने वडीलांच्या डोक्यात प्रहार केल्या नंतर वडील जमीनीवर कोसळले या भयंकर प्रकाराला पाहुण ग्रामस्थ (Villagers) भयभित झाले. परंतु गणेश नरवाडे हा वडीलांच्या मृतदेहाजवळच बसुन होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत आरोपीला ताब्यात घेतले.
मागील तीन महिण्यातील ही तीसरी घटना
लोणी बुद्रुक येथे पहिल्या घटनेची शाही सुकते न सुकते तोच मागील तीन महिन्यात ही खुनाची तिसरी घटना घडली आहे. यावेळी घटनेची गांभीर्याने दखल घेता पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल आयपीएस वाशिम (Superintendent of Police Navdeep Aggarwal IPS Washim) तसेच अतिरीक्त पोलिस अधिक्षक लता फड,पोलीस निरीक्षक भूषण गावंडे (Police Inspector Bhushan Gawande) पोलीस स्टेशन रिसोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली आहे.