रिसोड (Risod) : 2024 मध्ये संपन्न झालेल्या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या (Assembly Constituency) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कार्य करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकारी (Collector) तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुनेश्वरी एस. व रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर त्यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वाशिम येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर (Tehsildar Pratiksha Tejankar) यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून ते निवडणूक निकालापर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणुका शांततेत पार पडल्या. यादरम्यान मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गावागावात विविध पथकाद्वारे जनजागृती करून मतदान का केले पाहिजे. याबद्दल उत्कृष्ट कार्य करून मतदानाची टक्केवारी वाढविल्याबद्दलया उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. व उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.