रिसोड (Risod) : रिसोड तालुक्यातील दापुरी येथे 7 जानेवारीच्या मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी महसूल प्रशासनाने (Revenue Administration) अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर (Tractor) कारवाई केली. रिसोडच्या तहसीलदार (Tehsildar) प्रतीक्षा तेजनकर यांना गुप्त माहिती मिळाली की, रिसोड तालुक्यातील दापुरी येथे अवैध रेतीची वाहतूक होत आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर आपल्या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होऊन संबंधित रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तपासणी केली असता ट्रॅक्टर चालकाजवळ (Driver) रेतीची वाहतूक (Transport of Sand) करण्याचा अधिकृत असा कोणताही परवाना नव्हता; त्यामुळे रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.
रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात महसूल मंडळ अधिकारी संजय गोपीचंद मोहळे यांनी सदर ट्रॅक्टर चालक जुनेद खा सरवर खा राहणार शिरपूर हा आपल्या विना नंबरच्या ट्रॅक्टर मधून एक ब्रास रेती अवैध वाहतूक करीत असल्याचे आढळले. सदर ट्रॅक्टरचा पंचनामा, सुपूर्नामा व जप्तीनामा करून ट्रॅक्टर चालक जुनेद खा सरवर खा व ट्रॅक्टर मालक सलमा बी शेख सरवर राहणार मन्नास पिंप्री यांच्यावर गौण खनिज कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदरील ट्रॅक्टर शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये (Shirpur Police Station) जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई (Action) तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात महसूल मंडळ अधिकारी संजय गोपीचंद मोहळे, मनोज केनवडकर ग्रा म अ, मारोती भवाल ग्रा म अधिकारी, आर. आर. ससाने ग्रा म अधिकारी, पियुष तायडे ग्रा म अधिकारी व महसूल प्रशासनाच्या विशेष पथकाने केली.