शिबिरामध्ये क्रिकेट खेळाडूंसाठी क्रिकेट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी!
रिसोड (Risod) : रिसोड विदर्भातील नामवंत क्रिकेट अकॅडमी म्हणून ओळखली जाणारी रिसोड येथील क्रिक-किंग्डम क्रिकेट अकॅडमी बाय रोहित शर्मा यांनी यावर्षी क्रिकेट हंगामात उन्हाळी क्रिकेट शिबिराचे (Summer Cricket Camp) उद्घाटन रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमित झनक (MLA Amit Janak) यांच्या पत्नी प्रिती अमित झनक (Priti Janak) यांच्या हस्ते यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी रोहित दांदडे, प्रसाद गांजरे, नितीन शिरसाट इतर मान्यवर व खेळाडू उपस्थित या शिबिरा मध्ये क्रिकेट खेळाडूंसाठी क्रिकेट प्रशिक्षणाची (Cricket Training) सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.
खेळाडूंना सर्वोत्कृष्ट उपलब्ध सुविधा टर्फ क्रिकेट पीचेस, सिमेंट!
पीचेस, बॉलिंग मशीन (Bowling Machine), नेट बॉक्स व अकॅडमी कडून पांढरा ड्रेस, कॅप व क्रिकेट किट (Cricket Kit) पुरवण्यात येईल, व प्रमाणपत्र सुधा देण्यात येईल, तसेच या शिबिरा साठी सर्टिफाईड क्रिकेट कोचेस, महिला प्रशिक्षक विशिष्ट नियुक्त केले आहेत. शिबिरांमध्ये महिलांच्या फिटनेस कडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या उपक्रमातून नक्कीच देशासाठी व राज्यसाठी खेळणारी महिला खेळाडू घडले जातील व निदर्शनात येतील शिबिर कालावधी हा 1 मे ते 31 मे हा असेल, तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबिराचा लाभघ्यावा. असे आव्हान अकॅडमीचे संचालक मयूर तायडे, व्हीसीए स्टेट पॅनल अंपायर परेश अग्रवाल, दिपाली इंगळे, व्हीसीए ट्रेनर श्रद्धा भिंगे. अकॅडमीच्या समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.