वसमत रोडवरील असोला शिवारात अपघात मयत असोला यथील रहिवासी
परभणी (Road Accident) : वसमत रोडवरील वरील असोला शिवारात अॅटोला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात अॅटो मधील एकजण ठार झाला. या घटनेत संतोष धारोजी बोरचाटे वय अंदाजे ३५ वर्ष रा.असोला असे मयत युवकाचे नाव आहे. घटनेनंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. ही घटना गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार १२ फेबु्रवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास असोला येथील संतोष धारोजी बोरचाटे हा आपल्या अॅटो क्रमांक एम.एच.२२ ए.पी.२४२८ या अॅटोने परभणीहुन असोला गावाकडे जात होता. यावेळी परभणी – वसमत रोडवरील असोला शिवारात त्यांच्या अॅटोला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात अॅटो मधील संतोष बोरचाटे याच्या डोक्याला जोराचा मार लागला. घटनास्थळी असलेल्या इतर वाहनचालकांनी संतोष बोरचाटे याला परभणी येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. सदरील घटनेची माहिती इतर वाहनचालकांनी ताडकळस पोलीसांना दिली. ताडकळस पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अर्जुन रणखांब, बिट जमादार बालाजी रणेर, असोला पोलिस पाटील पंढरीनाथ रिक्षे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. सदरील घटने संदर्भात ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




