रास्ता रोको आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल!
मानोरा (Road Construction) : तालुक्यातील वरोली – सेवादासनगर – कार्ली – वरोली व वरोली ते कारखेडा हे सदरील मंजूर रस्त्याचे काम कंत्राटदाराच्या (Contractor) हलगर्जीपणामुळे अर्धवट काम करून रखडलेले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना ये – करण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सदरील रस्त्याचे काम येत्या 3 दिवसात सुरू करावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याच्या इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार डॉ. संतोष यावलीकर (Tehsildar Dr. Santosh Yavalikar) यांना या भागातील नागरिकांनी देताच प्रशासन (Administration) खडबडून जागे होऊन सबंधित विभागाने रस्ता कामाला सुरुवात केली आहे.
तांत्रिक व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर कंत्राटदार याजकडून कामाला सुरुवात!
निवेदनात नमूद केले आहे की, वरोली – कारली सेवादासनगर – वरोली ते कारखेडा कोटी रुपयाचे रस्त्याचे काम जनतेच्या मागणीनुसार स्व आ. राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले होते . वरील रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत सर्व तांत्रिक व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर कंत्राटदार याजकडून कामाला सुरुवात करण्यात आली. कंत्राटदाराने रस्ता खोदकाम, गीट्टी टाकली. त्यानंतर काम बंद पाडले. रस्ता काम बंद पडल्याने पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन नागरिकांना (Citizens) प्रवास करावा लागत होता. तसेच या नादुरुस्त रस्त्यावरून अनेकाना जीव गमावण्याची पाळी सुध्दा आलेली होती. त्यामुळे रखडलेले रस्ता काम तात्काळ मार्गी लावण्यासंदर्भात सबंधित कंत्राटदाराला आदेशित करावे. अन्यथा शहरातील दिग्रस चौकात रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Aandolan) छेडण्याचा इशारा ठाकुरसिंग चव्हाण, निळकंठ पाटील, विजय पाटील यांच्यासह या भागातील नागरिकांनी दिला होता. आंदोलनाचा धसका घेऊन प्रशासन खडबडून जागे होऊन रस्ता कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.