परभणी/सेलू(Parbhani) :- पाथरी रस्त्यावर बुलढाणा बँकेच्या वेअर हाऊस जवळ घोडा गाडी व टाटा इंट्रा गाडीमध्ये समोरासमोर धडक होऊन घोडा गाडी मधील दोघेजण गंभीर जखमी (seriously injured) झाले आहेत. हा अपघात शनिवार १५ जून रोजी रात्री आठच्या सुमारास झाला. घटनेची माहिती पोलीसांना कळताच अपघातात जखमी झालेल्या दोघांना सेलू उपजिल्हा रुग्णालय (hospital) दाखल करण्यात आले तर अपघातग्रस्त टाटा इंट्रा वाहन पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
वाहनाचा चालक झाला फरार
याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे कान्हड येथून सेलू मार्गे नाथ्रा येथे जाण्यासाठी आपल्या घोडा गाडीने प्रवास करणाऱ्या विजय गुलाब सोळुंके वय ३०वर्षे राहणार नाथ्रा तालुका पाथरी, मारोती गोविंद पवार वय ३५वर्षे राहणार आष्टी तालुका परतुर यांच्या घोडा गाडी सेलु-पाथरी रस्त्यावर बुलढाणा वेअरहाऊस जवळ गाडी क्रमांक एम. एच.२१बी.एच.३६४३ या टाटा इंट्रा गाडीने धडक दिली. दोन्ही वाहणात समोरासमोर शनिवार १५ जून रोजी रात्री आठ वाजता धडक झाली. या झालेल्या अपघातात(accident) दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर सेलु उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातग्रस्त टाटा इंट्रा वाहन पोलीसांनी ताब्यात घेतले असून रविवार १६ जून रोजी हा वृत्तांत लिहीपर्यंत ठाण्यात तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. घटनास्थळी अपघात झाल्यानंतर टाटा इंट्राचा वाहनांचा चालक मात्र फरार झाला आहे.