परभणी (Parbhani):- प्रभाग क्रमांक १२ मधील अंतर्गत मुख्य रस्त्याच्या मागणीसाठी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. या रस्त्याच्या कामाकरीता आश्वासन (assurance) देण्यात आले. मात्र अद्यापही रस्त्याचे काम (road work)सुरू झालेले नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्यावतीने(Shiv Sena) महापालिका आयुक्तांना शुक्रवार २८ जून रोजी निवेदन देण्यात आले.
रस्त्याचे काम न झाल्यास कोणतीही पूर्व कल्पना न देता महापालिकेवर गाढव मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे, शेख शब्बीर, अर्जून गवळी, शेख अजीज, अशोक गिराम, रामा कुलथे, चंद्रकांत इब्बीतवार, अमोल ढगे, एम.डी.चव्हाण, दिगंबर सुर्यवंशी, शिवाजी कच्छवे आदींची नावे आहेत.