Pusad Rain :- पाऊस (Rain) शहरासह तालुक्यात कोसळत आहे. ढगाळी वातावरण हवामानात बदल सातत्याने जाणवत आहे. पावसाच्या या रीपरीप ने शहरातील रस्ते मात्र चिखलमय झाले आहे. शहरातील नगरपरिषद (municipal council)अंतर्गत येत असलेल्या मेडिकेअर हॉस्पिटल कडे जाणार्या डीपी रोडवर मोठया प्रमाणात खड्यात चिखल (mud) साचला आहे. तर मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे शहरातील मेडिकेअर हॉस्पिटल कडे जाणारा मार्ग, उमरखेड रस्ता यासह अनेक भागातील रस्त्यावर खड्डे पडले त्यात पावसाचे पाणी साचले आहे.
इतर चिखलमय रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजवावेत जेणेकरून रस्त्यांवर येता जाताना नागरिकांना याचा त्रास होणार नाही
उमरखेड रस्त्यावरही व शहरातील अनेक भागात असेच चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांना शेतकर्यांना शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना (Students) मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर परिसरात मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळे येथे उपचाराकरिता तालुक्यासह यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णांना घेऊन येतात तर कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस यांना रात्री अपरात्री याच रस्त्याने कर्तव्यावर येणे जाणे करावे लागते. नगरपरिषद प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या परिसरासह इतर चिखलमय रस्त्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजवावेत जेणेकरून रस्त्यांवर येता जाताना नागरिकांना याचा त्रास होणार नाही. व अपघात घडणार नाहीत.


