पुसद (Pusad):- वाशिम या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण (Cement concreting) व पुढे डांबरीकरण रस्त्याच्या कडेला पथदिवे प्रवासी निवारा अशा सुविधा असलेला रस्ता जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यतून (Bank financing) पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखी खाली कंत्राटदाराने गेल्या काही दिवसा अगोदर रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र कालांतराने काही दिवसांतच रस्त्यावरील पथदिव्यांची अशी अवस्था झालेली दिसत आहे तर खंडाळा घाटात (Khandala Ghat)अपघात होऊ नये याकरिता रस्त्याच्या कडेला व दरी असलेल्या भागात लोखंडी पोल (Iron pole) लावण्यात आले होते.
थातूरमातूर काम करून संबंधितांनी दिलेल्या अर्थ पुरवठ्याचे वाटोळे
मात्र त्याची दुरावस्था झालेली दिसत असून. घाटातील अनेक वळणांवर तुटून मोडून पडलेले ते दिसत आहेत. करोडो रुपये खर्च करून जनहितार्थ (Public interest) संबंधितांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला (Construction Department) अर्थ पुरवठा करूनही कंत्राटदाराने मात्र थातूरमातूर काम करून संबंधितांनी दिलेल्या अर्थ पुरवठ्याचे वाटोळे केल्याचे दिसत आहे. या गंभीर बाबीकडे मात्र. स्थानिक लोकप्रतिनिधींसह इत्यादी राज्यकर्त्यांचे ही अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. तर पुसदच्या सार्वजनिक (Public) बांधकाम विभागाचं कामच अनोखा यांच्या संदर्भात न बोललेलंच बरं. जबाबदारीहीन कर्तव्य शून्य असलेल्या या विभागाचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे.