महागाव (Yawatmal) :- काळी दौलत वनपरिक्षेत्र कार्यालय (Forest Range Office) हद्दीत कार्यरत वनपाल संतोष बदकुले व दोन कर्मचार्यांनी रेतीची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरला अडवून ट्रक्टर चालक व मजुरांना बंदुकीचा धाक दाखवून १ लाख ७५ हजार रुपये लुटल्याची घटना २९ एप्रिल रोजी रात्री च्या सुमारास हिवरी गावाजवळ घडली.
ट्रॅक्टर सोडून देण्याचे बदल्यात १ लाख ७५ हजार रुपयांची मागणी
ट्रॅक्टर मालक अंकुश कोकरे यांच्या ट्रक्टर द्वारे चालक व काही मजुर रात्री च्या सुमारास रेतीची वाहतूक करीत होते. मंगळवार २९ एप्रिल रोजी रात्री वनपाल संतोष बदकुले व त्यांचं कर्मचारी कोळी व अविनाश राठोड यांनी काळी दौलत गावाजवळ सदर ट्रॅक्टर पकडले व बंदुकीचा धाक दाखवून ट्रॅक्टर (Tractor) चालक व मजुरांना वनविभागाच्या हद्दीत बळजबरीने नेले, ट्रॅक्टर चालक व मजूरांनी वनपाल संतोष बदकुले व दोन कर्मचार्यांना आम्ही तुमच्या हद्दीत नाही आहे असे सांगितले तरी त्यांनी ऐकलं नाही ट्रॅक्टर चालक व मजुरांना दमदाटी करीत त्यांच्या छातीवर बंदूक लावली व ट्रॅक्टर मालक अंकुश कोकरे यांना बोलावून घेतले व ट्रॅक्टर सोडून देण्याचे बदल्यात १ लाख ७५ हजार रुपयांची मागणी केली, पैसे नाही दिले तर सर्वांना जेलात टाकतो अशी धमकी दिली, घाबरलेल्या ट्रॅक्टर मालक अंकुश कोकरे यांनी लगेच दुसर्याकडून पैसे आणुन एक लाख ७५ हजार रुपये देत दंड पावती मागीतली असता उद्याला ऑफिस ला ये देतो असं सांगून ट्रॅक्टर सोडलं व एक लाख ७५ हजार रुपये घेऊन निघून गेले, दुसर्या दिवशी आफीसला जाऊन दंड पावतीची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी त्यांनी आतापर्यंत दंड पावती दिली नाही, त्यामुळे बंदुकीच्या धाकावर ट्रॅक्टर चालक व मजुरांना लुटणार्या व शासनाची दंड रक्कम हडप करणार्या वनपाल संतोष बदकुले कर्मचारी कोळी व अविनाश राठोड यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई (action) करण्यात यावी, अशी मागणी ट्रॅक्टर मालक अंकुश कोकरे यांनी ६ मे रोजी काळी दौलत वनपरिक्षेत्र अधिकारी व जिल्हाधिकारी विकास मिना यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.