हिंगोली (Hingoli):- १३ जुलै रोजी हिंगोली जिल्हयात ऑल आऊट ऑपरेशन (All out operation) राबवुन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुन्हेगारी वस्त्या तपासणी करण्याचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे घडणार नाहीत याची दक्षता व खबरदारी घेण्याबाबत अनुषंगाने पेट्रोलींग(Patrolling) करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे 13 जुलै रोजी नाकाबंदी लावण्यात आली होती.
एकुन 80 हजाराचा मुद्देमाल जप्त
दोन पथकामार्फत ऑल आऊटचे नियोजन करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासह पथक जवळा बाजार येथे पेट्रोलींग करीत असताना पहाटे 4.30 वा सुमारास कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समिती येथील पाण्याचे टाकीजवळ संशईत पाच इसम तिन मोटार सायकलवर अंधारात दबा धरुन उभे असलेले दिसले. व ते पोलिसांना पाहुन तीन मोटार सायकलवर पळून जात असताना त्यापैकी दोन मोटार सायकलवरील दोन चोरट्यांना पोलीस अंमलदार प्रितम चव्हाण, मारोती गडगिळे, नागनाथ नजान व चार होमगार्ड जाधव, घुगे, भवर यांनी पाठलाग करुन त्यांना कन्या शाळेजवळ दोन विधी संघर्षग्रस्त (conflicted) बालकास पकडुन त्यांची अंगझडती घेतली असता त्या दोघांचेही कमरेला नायलॉन दोरी, मिरची पुड, हातोडी, टामी व चाकु असे दरोडा टाकण्याचे दोन मोटार सायकल त्यापैकी एक हिरो स्प्लेंडर प्लस एम.एच.22 ए यु 1877 व दुस-याचे ताब्यातील होंडा शाईन क्र.एम.एच 38-वाय-2430 असा एकुन असा एकुन 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सदर गुन्हयातील ईतर तीनही आरोपीचा शोध घेण्यात आला असता ते अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. ताब्यात घेण्यात आलेल्या व पळुन गेलेल्या चोरट्या विरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.नि.गोविंद जाधव हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक जि. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात , पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हट्टा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, पो.उप.नि.गोविंद जाधव, पोलीस हवालदार गणेश सुर्यवंशी, कृष्णा चव्हाण, वनराज पाईकराव, ताम्रध्वज कासले, भुजंग कोकरे, शेख आसेफ व पोलीस अंमलदार मारोती गडगिळे, नागनाथ नजान, संदिप सुरुशे, प्रितम चव्हाण यांनी केली.