अर्जुनी मोर(Gondia):- तालुक्यातील येरंडी/देवी- सिलेझरी मार्गावर 14 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास 26 वर्षीय युवकास चार अनोळखी युवकांनी अडविले. दरम्यान चाकू व बंदुकीचा(gun) धाक दाखवून सोन्याची अंगठी असा एकूण 44 हजाराचे दागिने पळविले.
स्थानीक गुन्हेशाखा व अर्जुनी मोर. पोलीसांची संयुक्त कारवाई
या घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलिसात करण्यात आली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखा व अर्जुनी मोरगाव पोलिसांनी संयुक्त शोध कार्य सुरू केले. व अवघ्या बारा तासात वाटमारी करणाऱ्या चार आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना येश आले, विकी रामकृष्ण लाडे वय 18 वर्ष राहणार मुरझा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा, मनीष जयगोपाल दोनोडे वय 19 राहणार येरंडी/देवी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया, समीर रमेश मेश्राम वय 19 राहणार बारव्हा तालुका लाखांदूर, व मंथन गौतम टेंभुर्णे वय 19 राहणार खोलमारा तालुका लाखांदूर अशी आरोपींची नावे आहेत. येरंडी येथील मीनाल होमराज बहेकर वय 26 वर्ष हा युवक दुचाकीने येरंडी कडून सिलेझरी कडे जात होता.
मोटरसायकल ने त्या युवकाचा चार अज्ञात युवकांनी केला पाठलाग
दरम्यान पल्सर मोटरसायकल ने त्या युवकाचा चार अज्ञात युवकांनी पाठलाग केला. विहीरगाव फाट्याजवळ त्याला अडवून चाकू व बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या जबरीने काढून घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेची नोंद फिर्यादीच्या तक्रारीवरून अर्जुनी मोर. पोलिसात करण्यात आली. अर्जुनी मोर पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपास कार्याला सुरुवात करण्यात आली. दरम्यान लाखांदूर तालुक्यातील मुरझा येथील विकी लाडे 18 व येरंडी येथील मनीष दोनोडे 19 या दोन्ही युवकांना संशयाच्या आधारावर ताब्यात घेण्यात आले. दोघांची चौकशी (inquiry) केली असता त्यांनी वाटमारी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर या घटनेत आणखी दोन आरोपी असल्याचे सांगितले यावरून समीर रमेश मेश्राम वय 19 राहणार बारव्हा व मंथन गौतम टेंभुर्णे वय 19 राहणार खोलमारा या दोघांना अटक करण्यात आली. चारही आरोपींनी पोलिसाकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे.
वाटमारी प्रकरणात अर्जुनी मोरगाव पोलिसांनी चार आरोपींना केली अटक
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक दिनेश लबाडे, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार तुलसीदास लुटे, इंद्रजीत बिसेन, संतोष केदार, हंसराज भांडारकर, खंदारे, दीक्षित, दमाहे, धनंजय शेंडे, रोशन येरणे, संजय मारवाडे, पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम, रोहनकर, रमेश सेलोकर, बापू येरणे, रोशन गोंडाने, लोकेश कोसरे, गिरीश लांजेवार व भाजीपाले यांनी केली.
19 आगस्ट पर्यंत पोलीस कोठडी वाटमारी प्रकरणात अर्जुनी मोरगाव पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. चारही आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आले. दरम्यान न्यायालयाने 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी(custody) सुनावली आहे.