India vs England 3rd ODI :- इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या विजयासह, भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली. आता दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळला जाईल. हा सामना जिंकून भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची (England) मालिका क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.
मालिकेतील तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर
जर रोहित शर्मा (Rohit Sharma)तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १३ धावा करू शकला तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११००० धावा पूर्ण करेल. सध्या तो फक्त १३ धावा दूर आहे आणि इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो इतिहास रचू शकतो. रोहित शर्माची फलंदाजी आणि त्याचा उत्कृष्ट फॉर्म पाहता, तो पुढील सामन्यातच ही कामगिरी करेल अशी शक्यता आहे. रोहित सचिन-कोहलीच्या (Kohli)क्लबमध्ये सामील होईल. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ११ हजार धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे, ज्याने २०१९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सामन्यादरम्यान ही कामगिरी केली होती. यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव येते.
२००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध २८४ वा सामना खेळताना सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ११००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या. सचिन आणि कोहलीनंतर आता रोहित शर्मा या क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज झाला आहे.
रोहित आफ्रिदीचा विक्रम मोडू शकतो
अलिकडेच रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत २५८ डावांमध्ये ३३८ षटकार मारले आहेत. यापूर्वी, पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने ३६९ डावांमध्ये ३५१ षटकार मारले होते आणि तरीही तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. रोहित शर्माचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि त्याच्या फलंदाजीच्या शैलीमुळे तो एक उत्तम फलंदाज बनला आहे. येत्या सामन्यांमध्ये त्याला शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) विक्रम मोडण्याचीही संधी असेल.