– प्रदीप राउत
भिवापूर (Rojgar hami Yojana) : वर्षभर अनिश्चित हवामान त्यामुळे झालेले पिकांचे नुकसान ह्यामुळे हताश झालेल्या ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कुटुंबांना आता रोजगार हमी योजना ही आधार वाटू लागली असून भिवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात (Rojgar hami Yojana) रोजगार हमी योजनेचा माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना ग्रामीण हा आता केवळ ‘मजुरी’ ह्या संकल्पनेतून बाहेर पडून श्रमदानातून व्यक्तिगत कुटुंबाचा विकास व त्यातून गावाच्या नैसर्गिक व भौतिक संसाधनाचा विकास असा आकार घेत आहे. गावातील सर्वच थरातील कुटुंब आता ह्यात सहभागी होत असल्याने कामाची मागणी व मनुष्यदिवस ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
भिवापूर तालुक्यात मनुष्यदिवस निर्मितीत सर्वाधिक शेकडा प्रमाण झाले आहे. गोंडबोरी,इंदापूर,मानोरा, मांडवा सो,विरखंडी,वडध गावात कधी कामे होत नव्हती तेथे देखील गावकर्यांचा योजनेप्रती सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. (Election Code of Conduct) निवडणूक आचारसंहितेच्या पूर्वी शेल्फवर पुरेसे कामे मंजूर असल्याने काम उपलब्ध होण्यास कोणतीही अडचण नाही. निसर्गाचा समतोल राखणारी तलाव नाला खोलीकरण,सरळीकरण आणि शेतकर्यांना आवश्यक अश्या शेत पादंन रस्ताची अकुशल कामे मोठ्या प्रमाणात आलेसुर, बेसूर,बोटेझरी,धामणगाव गवळी,धामणगाव वि.म.,मांडवा लभान,नक्षी,सालेभट्टी चोर,झिलबोडी,भिवी येथे सुरू आहेत.
वृक्षलागवडमध्ये (tree planting) रस्ता दुतर्फा सावली वृक्षारोपण सोबतच प्रत्येक अंगणात फळझाड लागवड तसेच मोकळ्या जागांवर बांबूलागवडचे कामांसाठी खड्डे खोदकाम सुरू आहे. तुतीलागवड अंतर्गत रेशीम व्यवसाय देखील सुरू होणार असून त्यासाठी जिल्हा रेशीम विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे. मागील वर्षात अकुशल कामाचा प्रमाणात कुशल प्रमाण निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना संरक्षण भिंती सारखे कामे होवू शकले. तसेच मागेल त्या पात्र शेतकरी कुटुंबांना लाभ अंतर्गत सिंचन विहिरीचे कामे सुरू आहेत. त्यामुळे आता महात्मा गांधी रोजगार हमी योजना (Rural family) ग्रामीण कुटुंबाचा व गाव विकासाचा आधार बनत असल्याचे दिसत आहे.