विविध जातीच्या १०० रोपांची केली लगवड
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमात पार पडला कार्यकम
अमरावती (Rotary Club Plantation) : स्थानिक रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्यावतीने नुकतेच वृक्षारोपण प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. भानखेडा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमातील विस्तीर्ण परिसरात विविध प्रकारच्या एकूण १०० रोपांची लागवड यावेळी करण्यात आली.
वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. मानवी जीवनावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज ठरली आहे. याच संकल्पनेतून (Rotary Club Plantation) रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्यावतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून वृक्षारोपण प्रकल्पाचे आयोजन २० जुलैरोजी भानखेडा येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रम परिसरात करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दिलीप सौंदळे, रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाचे अध्यक्ष अमोल चवणे, उमेश गिलोरकर, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी मुळे साहेब, डॉ. युगंधरा गुल्हाने, डॉ.पवन देशमुख, अभय पेठे, डॉ.लोभस घडेकर, डॉ. पूजा कोल्हे, प्रदीप खंडेलवाल, सचिन माने उपस्थित होते.
यावेळी क्लबचे (Rotary Club Plantation) सर्व पदाधिकारी व सदस्य हे आपल्या परिवारासह या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी आश्रमातील ध्यान, भजन-संकीर्तनच्या माध्यमातून एक अध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतला.अल्पपपोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सुरेश मेठी, नरेंद्र खंडेलवाल, अतुल कोल्हे, राम छुटलानी, डॉ.प्रवीण बोडखे, रवी टांक, अखिलेश खेतान, गौरव वानखडे, हार्दिक कक्कड, विशाल वाटाणे, अमित तिडके, जितू पटेल, दिनेश सरावगी, डॉ पंकज मोरे , रेखा सोलव, गजेंद्र गुडधे यांच्यासह रोटरी व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे सदस्य उपस्थित होते.




