कारंजा(Washim):- कारंजा-अमरावती मार्गावर मागील काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनात वाढ झाल्याचे वृत्त देशोन्नतीने 13 मे रोजी अग्रक्रमाने प्रकाशित केल्याने या वृत्ताची दखल घेत आर.टी.ओ.ने कारंजा-अमरावती मार्गावर सोमवारी हजेरी लावली आणि अवैध वाहतूक (Illegal traffic) करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करून त्यांचेवर दंडात्मक कारवाई(action) केली. शिवाय सोमवारी बराच वेळपर्यंत या मार्गावर आरटीओचा (RTO)ठिय्या असल्याचेदेखील दिसून आले.
मनमानीमुळे ट्रॅव्हल्स रस्त्यात उभी करून रस्त्यावरच प्रवासी उतरवून दिले जात असल्याने अपघाताची शक्यता
मागील काही दिवसात या मार्गावर अपघाताच्या घटनात वाढ झाल्याचे घडलेल्या अपघातांवरून अधोरेखित होते. लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्या यामुळे प्रवासी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत असल्याने अवैध प्रवासी वाहतूक वाढली असून, ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीमुळे ट्रॅव्हल्स रस्त्यात उभी करून रस्त्यावरच प्रवासी उतरवून दिले जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रकार कारंजा अमरावती मार्गावर कामरगाव बस स्टॅन्डवर (bus stand) दिसून आला. कारंजा-अमरावती या मार्गावर मागील काही दिवसात अनेक अपघाताच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये अनेकांनाआपला जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले.या महामार्गावर(highway) ट्रॅव्हल्स चालकाकडून वाहतुकीच्या नियमाचे पालन न करता रस्त्याच्या मधोमध ट्रॅव्हल्स उभी करून प्रवासी उतरून दिले जातात. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध ट्रॅव्हल्स उभी केल्याने प्रवासी बेधुंदपणे धावत येऊन ट्रॅव्हल्समध्ये बसण्याचा प्रयत्न करतात.
दैनिक देशोन्नतीने 13 मे रोजीच्या अंकात प्रकाशित केल्याने आर.टी.ओं.नी त्याची दखल घेतली
परिणामी,अनेकदा छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडत असून, यातून एखादा संभाव्य अनर्थ घडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. अशा आशयाचे वृत्त दैनिक देशोन्नतीने(Daily Deshonnati) 13 मे रोजीच्या अंकात प्रकाशित केल्याने आर.टी.ओं.नी त्याची दखल घेतली आणि कारंजा अमरावती मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची सोमवारी झाडाझडती घेऊन अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील केल्याचे दिसून आले.