हिंगोली (RTO strike) : मोटार वाहन विभागातील कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप (RTO strike) पुकारल्याने कार्यालयातील कामकाज कोलमडले आहे. या संपात ११ कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपामुळे मात्र अधिकारी कार्यालयात तळ ठोकून असून आलेल्यांचे कामकाज त्यांनाच हाताळावे लागत असल्याने कामाचा ताण त्यांच्यावर वाढला आहे.
मोटार वाहन विभागासाठी महाराष्ट्र शासनाने २३ सप्टेंबर २०२२ रोजी सुधारीत आकृतीबंधाचा शासन निर्णय पारीत केला असून त्याला दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे; परंतु आकृतीबंधाच्या अंमलबजावणीसाठी शासन, प्रशासन स्तरावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्यावतीने २४ सप्टेंबर पासून मोटार वाहन विभागातील कर्मचार्यांनी (RTO strike) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपाच्या दुसर्या दिवशीही कार्यालयातील कामकाज कोलमडले आहे.