अमरावती (Rukhmini palanquin) : श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपुरकडे (Srikshetra Pandharpur) आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्याकरिता जाणाऱ्या माता रुख्मिणीच्या पालखीचे अंबानगरीत बियाणी चौकात आमदार ॲड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे या मंगलमय सोहळ्याकरिता सर्वच धर्मातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हा स्वागत सोहळा सामाजिक समतेचा वारसा जपणारा ठरला.
आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले स्वागत
श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील (Rukhmini palanquin) रुख्मिणी मातेची पालखी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे होणाऱ्या आषाढी सोहळ्याकरिता जाण्याची ४३० वर्षाची परंपरा आहे. श्रीक्षेत्र पंढरपुरच्या (Srikshetra Pandharpur) धर्तीवरच रुख्मिणी मातेचेही शासकीय पुजन व्हावे व श्रीक्षेत्र पंढरपुर येथे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रमाणेच (Rukhmini palanquin) रुख्मिणी मातेच्या पालखीलाही मानाचे स्थान मिळावे यासाठी आमदार ॲड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांनी भगिरथ प्रयत्न केले होते. त्यानुसार आता श्रीक्षेत्र पंढरपुर (Srikshetra Pandharpur) येथे रुख्मिणी मातेचे शासकीय पुजन व सोबतच या पालखीला पंढरपुर येथे मानाची पालखी असा दुग्धशर्करा योग घडून आला आहे. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून निघाल्यानंतर अमरावती शहरात आगमन होताच स्थानिक बियाणी चौकात या पालखीचे स्वागत करण्याची परंपरा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सुरु केली. त्यानुसारच या पालखीचे उत्स्फूर्त अन् जंगी स्वागत करण्यात आले.
बियाणी चौकात भक्तीरसाला उधान
बियाणी चौकात सायं 6.00 वा. रुख्मिणी मातेच्या पालखीचे (Rukhmini palanquin) आगमन होताच आमदार ॲड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांच्या हस्ते व उपस्थित असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे जल्लोष आणि भक्ती भावात स्वागत करण्यात आले. रुख्मिणी मातेची पालखी आणि भक्तीरसात तल्लीन झालेले वारकरी सोबत टाळ मृदंग आणि मुखात विठ्ठलाचे नाम असा मंगलमय सोहळा पार पडला. हा प्रसंग म्हणजे उपस्थित भाविकांसाठी आनंदाची पर्वणी ठरला.
सारांश
आमदार ठाकूर यांनी धरला फुगडीचा फेर
पालखीचे बियाणी चौकात आगमन होताच पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसोबत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेर धरला. त्यानंतर आमदार ॲड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांनी काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावर घेतली अन् त्यानंतर वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.
पालखीत स्वागत सोहळा ठरला सर्वधर्मसमभावाचा सोहळा
तिवसा विधानसभा मतदारसंघातील मोर्शी, भातकुली, तिवसा अन् भातकुली तालुक्यातील असंख्य भाविक तसेच शहरातील असंख्य प्रतिष्ठित व्यक्तिंनी यावेळी उपस्थिती दर्शविली. तसेच या मंगलमय पवित्र सोहळ्यात सर्व समाजातील नागरीक आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे हा पालखी स्वागत सोहळा सर्वधर्मसमभावाचे आणि एकतेचे दर्शन घडवणारा ठरला. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या स्वागत सोहळ्यालास्वागत सोहळ्याला खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके , माजी आमदार विरेंद्र जगताप, शिवसेना नेत्या प्रितीताई बंड, सुनिल खराटे, माजी जि.प. सभापती बाळासाहेब हिंगणीकर, विभागीय आयुक्त निधी पांडेय, विभागीय पोलिस महानिरक्षक पोकळे साहेब, शहर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, निवासी जिल्हाधिकारी भटकर साहेब, अमरावती पोलिस उपायुक्त शिंदे साहेब ,(Amravati Police) अमरावती पोलिस उपायुक्त सागर पाटील, अमरावती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष मोरे, उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, डॉ. अंजली ठाकरे, डॉ. राजिव ठाकूर, तिवसा पं.स. सभापती कल्पना दिवे, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, मनोजराव देशमुख, प्रकाशराव काळबांडे, प्रतापराव भुयार, अमित गावंडे, नितीन कदम, सतिष गोटे, अभय देशमुख, रमेश काळे, मुकद्दर पठान, गजानन राठोड, दिलीप सोनोने, माजी महापौर अशोक डोंगरे, पंकज देशमुख, अभिजीत बोके, जितेंद्र ठाकूर, शैलेष काळबांडे, अनिकेत देशमुख, रोषणी पुनसे, प्रविण मनोहर, वैभव वानखडे, रितेश पांडव आदी मान्यवर सहकुटुंब उपस्थित होते. तसेच शहरातील भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.