झोपेच्या डूलकीत नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज
जखमींवर ग्रामीण रुग्णलयात उपचार
अमरावती (Travel Accident) : समृध्दी महामार्गावर धावत असलेल्या पुणे नागपुर गंगा ट्रॅव्हल्स ने समोर असलेल्या एका ट्रकला मागुन जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हलसचा चार संतोष परिहार वय ४२ हा जागीच ठार झाला असुन १० ते १२ प्रवासी जखमी झाल्याची माहीती आहेत. घटनेची माहिती होताच मंगरुळ द. पोलीसांची चमू लगेच घटनास्थळी दाकल झाली व जखमींना पुलगांव व धामणगांव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
समृद्दी महामार्गावर आष्टा गावालगत असलेल्या चॅनल क्र. ९० जवळ सदरची (Travel Accident) घटना घडली असुन, मर्सिडीज बेंझ कंपनीची गंगा ट्रॅव्हल्स ची गाडी क्र.एमपी४५ झेड एफ ८८४९ ही पुण्यावरुन नागपुर ला नियमीत प्रमाणे जात होती. ट्रॅव्हलस मध्ये २७ प्रवासी होते दरम्यान पहाटे ५.३० च्या दरम्यान ट्रॅव्ह्ल्स ने समोरुन जात असलेल्या ट्रक क्र. एम एच ०४ जी एफ ०५१७ ला मागुन जबर धडक दिली.
या घटनेत ट्रक समृद्दी महामार्गाचा (Travel Accident) सुरक्षा कठडा तोडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडला तर ट्रॅव्हल्स चे नियंणण सुटल्याने ट्रॅव्हल्ससुध्दा रस्त्याच्या खाली उतरली या भिषषर अपघातात ट्रॅव्हल्स चालक संतोष परीहार याचा जागीच मृत्यू झाला. गणेश भरत गोळे वय२९रा.पुणे,आर्यन निलेश वाघगणे वय२३, कोथरुड पुणे,संतोष ना. शेलार, वय ४०,पारनेर अहमदनगर , दिपक पोपट शिंदे चाकण पुणे, योगेश राजकुमार थुगाणी, दयाल नगर, वर्धा,विनय अशोक मुक्केवार, वय २६ चंद्रपुर,अनिता सतीश नायक, वय ६१ लोदीपुरा नागपुर, सुरेंद्र साहेबराव शिरसाट वय ५६ कानाडोंगरी हिंगणघाट, सोनु कुमार साहू, वय२३ प्रयागराज,शबा शेक मो. याया शेख वय ३० घाटकोपर मुंबई हे जखमी झालेत व इतर दोन जणांना किरकोळ मार लागला आहे.
उर्वरीत पुलगांव येथील उपचारार्थ दाखल जखमींची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान मंगरुचळ द. पोलीसांनी माहिती मिळताच ठाणेदार गौतम इंगळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना पुलगांव व धामणगांव रेल्वे येथील रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. समृध्दी महामार्गावरील अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस होत असलेली वाढ व बहुतांश घटनांमध्ये (Travel Accident) अपघातांचे कारण ही पहाटेच्या वेळी येणारी झोपेची डुलकी ठरली आहे. या घटनेतही ट्रॅव्हल्स चालकाला धावत्या ट्रॅव्हलमध्येच क्षणभर झोपेची डुलकी आल्याने वेग अनियंत्रीत होऊन सदरचा अपघात झाल्याचा प्राथमकि अंदाज मंगरुळ द. पोलीसांनी व्यक्त केला आहे.
ट्रॅव्हल्स मध्ये एकच कल्लोळ आणि धावपळ : दाराचा काच फोडून प्रवासी बाहेर
पहाटे साडेपाचच्या सुमारास साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना अचानक एक मोठ्ठा आवाज होऊन ट्रॅव्हल्स् धडकल्याचे कळले आणि धावपल सुरु झाली आम्ही वाहनातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होतो मात्र काच बंद असल्यने बाहेर पडता येत नव्हते. अश्या परिस्थितीत वाहनाच्या दाराचा काच फोडून प्रवासी बाहेर पडल्याचे सुरेंद्र शिरसाट यानं सांगितले.