मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन गेले रजेवर
परभणी (Rural Development) : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार पाचव्यांदा जिल्हा (Rural Development) ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर (Rashmi Khandekar) यांनी घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी शुक्रवार ५ जुलै रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्याकडे मुख्य कार्यकारी पदाची सुत्रे हस्तांतरीत केली. सीईओ विनय मुन यांची वैयक्तीक कारणांनी मागील सोमवार १ जुलै पासून येत्या ३१ जुलै पर्यंत रजा मंजुर झाली आहे. त्यामुळे आज शुक्रवार ५ जुलै रोजी विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने (Rural Development) ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्याकडे सीईओ पदाचा अतीरिक्त प्रभार देण्यात आला आहे.
रश्मी खांडेकर यांनी घेतला पदभार
सोमवार १ जुलै रोजीच त्यांची रजा मंजुर झाली होती. मात्र बहुप्रतिक्षित आंतरजिल्हा शिक्षक बदली आणि नवीन शिक्षक भरतीच्या पवित्र प्रणालीतुन आलेल्या शिक्षकांची पदभरती प्रक्रिया काल गुरुवार ४ जुलै रोजी पुर्ण केल्या नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन हे रजेवर गेले आहेत. जिल्हा (Rural Development) ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी यापुर्वी देखील चार वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार स्विकारलेला आहे. या पदावरील त्यांचे कार्य समाधानकारक असल्यामुळे यावेळी देखील मुख्य कार्यकारी पदाचा प्रभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे श्रीमती रश्मी खांडेकर (Rashmi Khandekar) यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा विक्रमी पाचव्यांदा प्रभार घेतला आहे.