अर्जुनी/मोरगाव (Gondia):- ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ता.3 जुलै रोजी मोरगाव टिपाईंट जवळील हिमालया बार जवळ दुपारी 1:00 वाजताच्या दरम्यान घटना घडली असुन दुचाकीस्वार मृतकाचे नाव शिवलाल चुन्नीलाल लाडे वय 42 वर्ष राहणार निलज ता.अर्जुनी/मोरगाव असे आहे.
भरधाव चेचीस ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, मृतक शिवलाल लाडे हे आपल्या निलज गावा वरुन आपल्या पत्नीला घेवुन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र जमविण्यासाठी तहसिल कार्यालय (Tehsil Office) अर्जुनी/मोरगाव येथे गेले होते. एक कागदपत्र घरी विसरल्याने शिवलाल एकटाच घरी जावुन कागदपत्र घेवुन अर्जुनीला परत येत असताना मोरगाव टिपाईंटवरील हिमालया बार समोर वडसाकडुन कोहमाराकडे जाणाऱ्या विना नंबरच्या भरधाव चेचीस ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. धडक दिल्यानंतर ट्रक पळुन जाण्याचे प्रयत्नात असताना अर्जुनी/मोरगाव पोलीसांनी पाठलाग करत नवेगाव/बांध जवळ चेचेस ट्रक पकडुन नवेगाव/बांध पोलीस स्टेशनला (Police station)लावण्यात आला. जखमी शिवलालला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी/मोरगाव येथे हलविण्यात आले.मात्र तेथील डाॅक्टरांनी त्याला मृत (Dead) घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बिट अंमलदार रोषन गोंडाणे करीत आहेत.
जडवाहन गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने जात असतात
वडसा-कोहमारा राज्य मार्गावरील मोरगाव टिपाईंटवरील येथे अनेक घटना घडल्या असुन या मार्गावर कोहमारा कडुन वडसा कडे तसेच वडसा कडुन कोहमारा कडे जाणारे जडवाहन गतिरोधक (Heavy vehicle immobilizer) नसल्याने सुसाट वेगाने जात असतात. त्यामुळे दोन्ही बाजुला गतिरोधक बसविण्याची मागणी आता नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली असुन राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांना कागदपत्रांकरिता वेठीस धरु नये जेणे करुन लाभार्थी महिला किंवा त्यांचे पती कागदपत्राकरिता ईकडे-तिकडे भटकणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हि सरसकट देण्याची मागणी शुद्धा नागरिकांनी केली आहे हे विशेष.