नवी दिल्ली/मॉस्को (Nuclear Power Plant on Moon) : चांद्रयान-3 च्या यशाने प्रोत्साहित होऊन भारत आता रशियाच्या मून अणुऊर्जा प्रकल्पाकडे बघत आहे. रोसाटॉमच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचा उद्देश चीनच्या सहकार्याने चंद्रावर तळ स्थापित करण्याचा आहे. रशियामध्ये चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प (Nuclear Power Plant) उभारण्यासाठी प्रस्तावित केलेल्या डिझाइनमधून सुमारे अर्धा मेगावाट ऊर्जा निर्माण होऊ शकते. रशियन स्पेस एजन्सी रोसाटॉमचे प्रमुख अलेक्सी लिखाचेव्ह यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सांगितले की, मॉस्को आणि नवी दिल्ली हे दोन्ही देश या प्रकल्पावर सहकार्य करण्यास उत्सुक आहेत.
भारताच्या वाढत्या अवकाश महत्त्वाकांक्षा
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरलेल्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर या (Nuclear Power Plant) प्रकल्पात भारताची आवड लक्षणीयरीत्या वाढली आहे. भारताने 2035 पर्यंत आपले पहिले स्पेस स्टेशन, इंडियन स्पेस स्टेशन (BAS) स्थापन करण्याची योजना आखली आहे आणि 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताने 2023 मध्ये आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली होती. ज्यामुळे अंतराळ संशोधनासाठी भारताची वचनबद्धता आणखी मजबूत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोला 2040 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्यासह “नवीन आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टे” पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रावर अणुऊर्जेची गरज का?
चंद्रावर सौर ऊर्जेची एक विशिष्ट मर्यादा आहे. ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर नवीन शोधांसाठी अणुऊर्जा सतत आवश्यक मानली जात आहे. NASA ने चंद्राच्या तळांसाठी आण्विक अणुभट्ट्या वापरण्याचा विचार केला आहे. कारण सौर ऊर्जा प्रणाली चंद्राच्या 14-दिवसांच्या रात्री शाश्वत ऊर्जा प्रदान करू शकत नाही. NASA ने विकसित केलेल्या संकल्पनेनुसार, चंद्रावर सौर ऊर्जा प्रणालींना मर्यादा असताना, अणुभट्टी कायमस्वरूपी छायांकित भागात किंवा चंद्रावर, अणुभट्टी ठेवली जाऊ शकते. (Nuclear Power Plant) पॉवर प्लांट सतत वीज निर्माण करू शकतात. यामध्ये आव्हाने असूनही सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. चंद्रावर अणुइंधन पोहोचवणे सुरक्षित आहे आणि काही समस्या उद्भवल्यास अणुभट्ट्या आपोआप बंद होऊ शकतात.