रियाध (Russia-Ukraine War) : युक्रेन युद्ध संपवण्याच्या प्रक्रियेत सौदी अरेबियाची राजधानी रियाध हे एक महत्त्वाचे ठिकाण बनू शकते. आज रियाधमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यात शांतता चर्चेची रूपरेषा तयार केली जाणार आहे. या बैठकीत युक्रेन युद्ध संपवणे आणि अमेरिका-रशिया (Russia-Ukraine War) संबंधांमधील अडथळे दूर करणे, यावर विचार केला जाणार आहे. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. ज्यामुळे दोन्ही देशांमधील सामान्य संबंधांना बाधा आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Russia-Ukraine War) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Donald Trump) यांच्यात 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर, दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रुबियो रियाधमध्ये एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ आणि ट्रम्पचे मध्य पूर्व राजदूत स्टीव्ह विटकाल्फ यांचा समावेश असेल. रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व लावरोव्ह करतील आणि त्यात पुतिन (President Vladimir Putin) यांचे सल्लागार युरी उशाकोव्ह आणि इतर वरिष्ठ अधिकारी असतील.
ट्रम्प आणि पुतिन यांच्यात थेट भेट
रियाधमधील या बैठकीच्या सकारात्मक निकालांनंतर, ट्रम्प (President Donald Trump) आणि पुतिन (President Vladimir Putin) यांच्यात थेट बैठक होण्याची शक्यता आहे. जी चार वर्षांपासून सुरू असलेला जागतिक तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. या शांतता चर्चेत युक्रेन आणि युरोपमधील प्रतिनिधींनाही समाविष्ट केले जाऊ शकते, असेही रुबियो म्हणाले. दरम्यान, (Russia-Ukraine War) अमेरिकेतील नागरिक कालोब बायर्स यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर, त्यांची सुटका करून रशियाने अमेरिकेप्रती सद्भावना दाखवली आहे.