प्रशांत ढोरे यांची राज्याचे महसूल मंत्र्याकडे तक्रार
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Ryat Kranti Association) : चिखली तालुक्यातील इसरुळ या गावचे माजी सरपंच पती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांच्यावर दे राजा व चिखलीचे तहसीलदार यांनी गुन्हे दाखल करून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार चालविला आहे. असे निवेदन (Ryat Kranti Association) रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते (Prashant Dhore Patil) प्रशांत ढोरे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, इसरुळ येथील माजी सरपंच पती संतोष भुतेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध रेती उत्खनन व वाहतूक या संदर्भात वेगवेगळे आंदोलन व सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रारी करूण पाठपुरावा करत आहेत. तरी देखील असे असतांना चिखली व दे राजा तहसील अंतर्गत खडकपूर्णा नदीपात्रातून होणाऱ्या अवैद्य उत्खनन व वाहतुक धारकांवर कारवाई करण्याचे सोडून जी व्यक्ती हे धंदे बंद करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यामातून शासन दरबारी आवाज उठवत असेल तर त्यांच्यावर अश्या प्रकारे कारवाई करणे म्हणजे लोकशाहीवर गदा आणणे होय.
सदर केलेल्या कार्यवाही मध्ये असे दिसते की, संतोष भुतेकर हे महसूल अधिकारी यांच्यावर हप्तेखोरीचे करत असलेले आरोप चुकीचे नसून अवैध उत्खनन व वाहतूकदार यांना आर्थिक देवाण घेवाण करून पाठीशी घालण्याचे काम महसूल अधिकारी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे, महसूल प्रशासनाकडून तात्काळ संतोष भुतेकर यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे व चोर सोडून संन्याशाला फाशी देणाऱ्या अधिकाऱ्याची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा (Ryat Kranti Association) रयत क्रांती संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील (Prashant Dhore Patil) यांनी महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे.