Nanded:- नांदेड चे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अचानक निधनाने काँग्रेस (Congress) पक्षाचे नुकसान झाले असून वसंतराव चव्हाण हे दोन वेळा माझ्यासोबत विधान परिषदेचे(Legislative Council) आमदार म्हणून अतिशय चांगल कार्य केले २० वर्ष नायगावचे सरपंच जिल्हा परीषद सदस्य म्हणून काम करत असताना लोकांचें प्रश्न सोडविण्यासाठी सतत कार्य करायचे काही दिवसापूर्वी नुकतेच ते नांदेड येथून लोकसभेवर काँग्रेसकडून निवडून आले होते. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने काँग्रेसचे नुकसान तर झाले आहे. त्यांच्या माध्यमातून नांदेड व परिसरातील विकासकामाला सूरवात करण्याअगोदरच नियतीने त्यांना आपल्यातून घेवून गेले सकाळी जेव्हा हि दुःखद बातमी कळाली विश्वास बसेना त्यांच्या दुःखात माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख परिवार सहभागी आहे.
दुःखात देशमुख परिवार सहभागी
दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण हे यापूर्वी दोन वेळा आमदार असताना सभागृहात ज्वलंत समस्या मांडायचे विकासाची कामे करण्यासाठी पाठपुरावा करून लोकांशी संवाद ठेवायचे एखादा विषय मार्गी लावण्यासाठी ते पाठपुरावा करायचे एक स्वच्छ विकास भुमिख अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ओळख झाली होती. त्यांच्या अचानक जाण्याने काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले आहे ते कधीही भरून निघणार नाही त्यांच्या दुःखात माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख परिवार सहभागी आहे.