पत्रकारपरिषदेत दिली माहिती
परभणी/पाथरी (Saeed Khan) : माजी आ. दुर्राणी यांच्या कारकिर्दीत झालेल्या विविध प्रकरणांचा हवाला देत या सर्व प्रकरणात माझ्याकडे पुरावे असून सर्व पुरावे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे देणार असून दुर्राणी यांच्यावर लवकरच मोठी कारवाई होईल असे वक्तव्य शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान (Saeed Khan) यांनी बुधवारी एका पत्रकारपरिषदेमध्ये केले.
राजकिय षडयंत्र रचल्याचे केले खंडन
शहरातील बी. एस. कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार दुर्राणी यांच्यावर आत्महत्येस प्रवर्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात शिंदे गटाकडून राजकीय षडयंत्र रचत माझे नाव घेण्यात आल्याचा आरोप दुर्राणी यांनी माध्यमांद्वारे केला होता. या रोपांचे खंडन करण्यासाठी शिवसेना कार्यालयामध्ये बुधवार 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अल्पसंख्यांक प्रदेश सचिव आसेफ खान , शिवसेना जिल्हाप्रमुख नाना टाकळकर , शिवसेना नेते दादासाहेब टेंगसे, मुंजाजी भाले पाटील, पप्पू घाडगे, विठ्ठल रासवे आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना सईद खान (Saeed Khan) म्हणाले की, मा. आमदार दुर्राणी यांच्या विरोधात फिर्याद देणारी व्यक्ती ही त्यांचा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्र्यांचा किंवा आमच्या पक्षातील कोणाचाही दबाव आणत गुन्हा नोंद करण्याचा प्रश्न येत नाही. दुर्राणी यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे माझ्याकडे असुन उद्याच मुख्यमंत्र्याची भेट घेत कारवाईची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.