बुलडाणा (Sagvan Sarpanch Deva Dandge) : अर्चनाताई वानरे यांनी 6 सप्टेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या (Sagvan Sarpanch) सरपंच पदावर देवानंद दांडगे (Deva Dandge) यांची अविरोध निवड झाली आहे. बुलढाणा शहराचाच एक भाग समजला जाणारी सागवन ग्रामपंचायत उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर आहे. त्याच ग्रामपंचायत भवनात मंगळवार 24 सप्टेंबर रोजी सरपंच निवडीसाठी बैठक बोलण्यात आली होती, मंडळ अधिकारी पिंपळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 17 सदस्यांच्या (Sagvan Sarpanch) सागवान ग्रामपंचायत मध्ये जवळपास सर्व सदस्यांनी एकमताने देवाभाऊ दांडगे (Deva Dandge) यांची सरपंचपदी अविरोध निवड केली. यापूर्वी ते उपसरपंच होते. देवाभाऊ दांडगे हे आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचे कट्टर समर्थक आहेत, हे येथे विशेष !
Sagvan Sarpanch Deva Dandge: सागवन सरपंचपदी देवा दांडगे अविरोध

Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics